एक्स्प्लोर

9 कोटींच्या चर्चित दरोडा प्रकरणातील आरोपीची पाठलाग करत भरवस्तीत हत्या, सांगलीत खळबळ

Sangli Crime : सांगलीमध्ये धारदार शस्त्राने भरवस्तीमध्ये एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मैनुद्दीन मुल्ला असं या व्यक्तीचे नाव असून कोल्हापूरच्या वारणानगर नऊ कोटी चोरी प्रकरणातला तो मुख्य संशयित आरोपी आहे.

सांगली : सांगलीमध्ये धारदार शस्त्राने भरवस्तीमध्ये एकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. पाठलाग करून शहरातील गणेशनगर भागात ही हत्या करण्यात आली आहे. मैनुद्दीन मुल्ला असे या व्यक्तीचे नाव असून कोल्हापूरच्या वारणानगर नऊ कोटी चोरी प्रकरणातला तो मुख्य संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे. 2016 साली सांगली-मिरज रोडवरील बेथलेमनगर मधील घरातून मुल्लाकडून 9 कोटी रुपये पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या या दरोड्यामध्ये पुढे सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह सात पोलीस कर्मचाऱ्यांना या चोरी प्रकरणी अटक झाली होती. तर मैनुद्दीन मुल्ला हा जामिनावर बाहेर होता.

सांगली शहरातल्या गणेशनगर येथील अलिशान चौक या ठिकाणी मैनुद्दीन मुल्लाची हत्या करण्यात आली आहे. पाठलाग करून मुल्ला याची भरवस्तीमध्ये रात्री 9 च्या सुमारास हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. घरामध्ये मुल्ला गेल्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी गंभीर वार केला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेनंतर सांगली शहर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. तर याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मृत मैनुद्दीन मुल्ला हा कोल्हापूर जिल्ह्याच्या वारणानगर या ठिकाणी 2016 मध्ये झालेल्या नऊ कोटी दरोड्यातील मुख्य आरोपी होता. पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या या दरोड्यामध्ये सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांसह सात पोलीस कर्मचाऱ्यांना या चोरी प्रकरणी अटक झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget