हृदय पिळवटून टाकणारी घटना, गणेशोत्सव मिरवणुकीत घुसला टँकर, 10 जणांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान एका टँकरने लोकांना धडक दिल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Accident News : कर्नाटकमधील हासन जिल्ह्यातील मोसाळे होसळी गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान एका टँकरने लोकांना धडक दिल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 20 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. तर 10 हून अधिक जणांची स्थिति चिंताजनक आहे. काही वेळापूर्वी ही घटना घडली आहे.
हासन तालुक्यातील मोसाळे होसळी गावात धक्कादायक घटना घडली आहे. हासन-म्हैसूर राष्ट्रीय महामार्गवर हा अपघात झाला आहे. रस्त्याच्या एका बाजूला मिरवणूक होती. दुसऱ्या बाजूला वाहतूक सुरु होती. दुभाजक तोडून रस्त्याच्या एका बाजूने टँकर आला होता. हजारो लोकांच्या मिरवणुकीला एका टँकरने धडक दिली. माजी मंत्री एचडी रेवन्ना घटनास्थळी होते. कौन्सिल सदस्य सूरज रेवन्ना आणि खासदार श्रेयस पटेल उपस्थित होते. अपघातामुळं मिरवणुकीत गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी धावाधाव करू लागले. घटनास्थळी असलेल्या पोलीसांनी लगेच जखमींना उपचारासाठी हलवण्याची व्यवस्था केली. मात्र, या अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. तर यामधील 10 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
नाशिक जिल्ह्यातही आज भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील सटाणा (Satana) तालुक्यातील ताहाराबाद - अंतापूर मार्गावर गुरुवारी (11 सप्टेंबर) रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन आणि टाटा कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघातात कारच्याा समोरील भागाचा चक्काचूर
मृतांमध्ये तान्हाजी सोनवणे, शंकर आबीस, आणि आशा सोनवणे यांचा समावेश आहे. सर्व मृत आणि जखमी मजूर हे सटाणा तालुक्यातील हनुमंत पाडा, बोरदैवत आणि असेरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, पिकअप वाहन चालकाने आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारच्याा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर ताहाराबाद - अंतापूर मार्गावर काही वेळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना वाहनांद्वारे शासकीय रुग्णालयात हलवले. गंभीर जखमींपैकी दोन मजुरांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























