एक्स्प्लोर
गणपतीनिमित्त नातेवाईकांकडे जाताना अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

नागपूर : नागपूरच्या भिवापूर तालुक्यातल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. धपरला विरखंडी शिवारात मारूती 800 कार आणि वाळूच्या ट्रकचा भीषण अपघात झाला.
या अपघातात मारुतीतून प्रवास करणाऱ्या बावनकर कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रवी बावनकर (वय - 40 वर्षे), वर्षा बावनकर (वय - 35 वर्षे) आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा ग्रंथिक हे तिघे या अपघात मृत्युमुखी पडले.
बावनकर हे नागपूर जिल्ह्यातील उमरखेडचे रहिवाशी होते. हे सर्व गणपतीनिमित्त भंडारा जिल्ह्यातल्या पवनीच्या आपल्या नातेवाईकडे जात होते. त्याचवेळी काळानं त्यांच्यावर घाला घातला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
