एक्स्प्लोर

Mumbai Accident: 12 वीच्या पेपरला निघालेला विद्यार्थी लोकलमधून पडला; शिवनेरी गडावरुनही तरुण दरीत पडला, दोघांचा अपघाती मृत्यू

दरम्यान, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरही एका तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Mumbai: बारावीच्या पहिल्याच पेपरसाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्यावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. डोंबिवली येथील रहिवासी असलेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडून अपघाती मृत्यू झाला. ही घटना कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.डोंबिवली येथील रहिवासी असलेला सोहम कटरे हा विद्यार्थी बारावीच्या पहिल्याच परीक्षेसाठी घरातून निघाला होता. दरम्यान, जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावरही एका तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नेमकं घडलं काय?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षा आज पासून सुरू झाल्या आहेत. बारावीच्या पहिल्याच परीक्षेसाठी सोहम कटरे हा घरातून निघाला होता. त्याचं परीक्षा केंद्र कळव्यातील मनिषा विद्यालयात होतं. नेहमीप्रमाणे तो लोकल ट्रेनने प्रवास करत होता. मात्र, सकाळच्या वेळेत लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या गर्दीमुळे सोहमचा तोल जाऊन तो चालत्या लोकलमधून खाली पडल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

या अपघातात सोहमचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. बारावीच्या पहिल्याच पेपरला जाणाऱ्या विद्यार्थ्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. तसेच, परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे.या घटनेनंतर पुन्हा एकदा लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दररोज हजारो विद्यार्थी आणि प्रवासी जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचं या घटनेतून समोर आलं आहे.

शिवनेरी गडावरुनही तरुण दरीत पडला

दरम्यान, जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले शिवनेरी गडावर फिरायला आलेल्या शिरूर येथील रहिवासी मंगेश सोनवणे याचा मृतदेह सनसेट पॉईंटजवळील कड्यावरून सुमारे ७०० फूट खोल अंबरखानाच्या पाठीमागील दरीत आढळून आला आहे. जुन्नर वनविभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त पथकाने रेस्क्यू मोहिम राबवून मृतदेह बाहेर काढत शवविच्छेदनासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Live blog updates: पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, भाषणाला सुरुवात
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
Embed widget