एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/08/2017
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या मुख्य बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/08/2017
- अॅक्सिस बँकेचा धमाका, 30 लाखांवरील गृहकर्जदारांचे 12 हफ्ते माफ, तुमच्या गृहकर्जाचे हप्ते कसे माफ होऊ शकतात? https://goo.gl/VMMW4u
- आता डेडलाईन नाही, मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर लागतील, तिन्ही डेडलाईन हुकल्यानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडेंची सावध भूमिका https://goo.gl/UZ1o1f
- मुंबई महापालिकेतील शिवसेना आणि भाजपचं 84-82 समीकरण बदलण्याची शक्यता, वॉर्ड 116 मधून काँग्रेसच्या प्रमिला पाटील यांच्या निधनानंतर सून जागृती पाटील भाजपकडून पोटनिवडणूक लढवणार, आशिष शेलार यांची घोषणा https://goo.gl/irhfQJ
- आपापसातले हेवेदावे विसरा आणि कामाला लागा, मिशन 2019 च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा शिवसैनिकांना आदेश https://goo.gl/ZuxRPV
- सदाभाऊंचं मंत्रिपद काढून घेण्यापेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणखी एक मंत्रिपद देण्याचा विचार, कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य https://goo.gl/kWtMxD
- हातकणंगलेबाहेर निवडणूक लढवून दाखवा, सदाभाऊ खोत यांचं राजू शेट्टींना खुलं आव्हान, शेट्टींना सदाभाऊक्लेश झाल्याचीही टीका https://goo.gl/9Wg3op
- सत्ता कुणालाही दिली तरी माझ्याकडेच यावं लागेल, मिरा भाईंदरमधील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, काँग्रेसचा आक्षेप, मतदारांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप, प्रचाराच्या तोफा थंडावल्या https://goo.gl/dmtyqo
- लोकसभेसाठी देशात 350 तर महाराष्ट्रात 48 पैकी 28 जागा जिंकण्याचं भाजपचं लक्ष्य, अमित शाह यांच्या बैठकीत मंथन https://goo.gl/DedkHN
- डोकलाम वाद सुरु असतानाच चीनमध्ये होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदी चीनला रवाना होणार http://abpmajha.abplive.in/
- डोंबिवलीत भरदिवसा महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, बाईकस्वारांनी पाठलाग करुन महिलेला वाचवलं, आरोपी रिक्षाचालकाला बेड्या https://goo.gl/MQff5m
- मुंबईत जादूगार गँगचा धुमाकूळ, पापणी मिटण्यापूर्वीच मौल्यवान ऐवज हातोहात लंपास, गँगचा कारनामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/MzikKE
- भाजप प्रवेशापूर्वी चौकशीची मागणी करणारे फडणवीस चिडीचूप; गावित, पाचपुते, रोचकारी, खतगावकरांची चौकशी नाहीच, महाराष्ट्र भाजप गंगेचा घाट आहे का? माझाचा स्पेशल रिपोर्ट https://goo.gl/kE13zH
- 40 हजार पगार असलेल्या रेल्वे गार्डकडून तेजस एक्स्प्रेसमधील 180 रुपयांच्या नळाची चोरी, मनोज भडांगेविरुद्ध गुन्हा दाखल https://goo.gl/Kb9dBn
- प्रमोटर्ससोबतच्या वादामुळे इन्फोसिसचे सीईओ आणि एमडी विशाल सिक्का यांचा राजीनामा, कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण https://goo.gl/VjC4iR
- ना बॉम्ब, ना बंदूक, दहशतवाद्यांनी गर्दीत व्हॅन घुसवली, स्पेनमधील दोन हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू, आयसिसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली https://goo.gl/jQeBzA
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement