एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2020 | रविवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च 2020 | रविवार 1. समाजात तेढ निर्माण करून केंद्रात सत्ताधारी राजकीय फायदा घेत आहेत, मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात दिल्ली दंगलींवरुन केंद्र सरकारवर शरद पवारांची मोठी टीका 2. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्या नेत्यांवर अजित पवारांचा हल्लाबोल, मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचेही संकेत 3. औरंगाबाद, जालना, सोलापूरसह राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आजही पावसाचा अंदाज 4. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते गिरणी कामगारांसाठी साडे तीन हजाराहून अधिक घरांची सोडत, घर विकून मुंबईबाहेर जाऊ नका, मुख्यमंत्र्यांचं गिरणी कामगारांना आवाहन 5. शिवसेनेचे मुखपत्र ‘दैनिक सामना’च्या संपादकपदी रश्मी ठाकरेंची नियुक्ती, संजय राऊत नाराज असल्याची चर्चा, नाराज नसल्याचं राऊतांकडून स्पष्ट 6. 'ठाकरे' स्वतःसाठी काही घेत नाहीत असं म्हटलेले, मात्र आता सगळंच घेत आहेत, रश्मी ठाकरेंची ‘सामना’ संपादकपदी नियुक्ती झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची टीका 7. मुंबईत आझाद मैदानातील मराठा आंदोलकाची प्रकृती बिघडली,34 दिवसांनंतरही सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष, विरोधकांचा सरकारवर घणाघात 8. नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ, मात्र संशयिताचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं स्पष्टीकरण 9. इंदोरीकर महाराजांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता, अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची वंचित आघाडीची मागणी , तर “जगा अन् जगू द्या”म्हणत इंदोरीकरांच्या समर्थनात सिंधुताई सपकाळ यांची भावनिक साद 10. भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांचं पुन्हा लोटांगण, टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर ब्लॉग : पैलवानांनी आर्थिक नियोजनाची घडी कशी बसवावी? पै. गणेश मानुगडे यांचा ब्लॉग यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण























