एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार
दिवसभरात महत्तावाच्या बातम्यांचा वेगवान आढावा
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 11 ऑक्टोबर 2019 | शुक्रवार*
- काँग्रेसमुळे राज ठाकरे यांना महाआघाडीत घेऊ शकलो नाही, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली खंत https://bit.ly/326PonH
- काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एका कुटुंबाची पार्टी तर भाजप देश चालवणारा पक्ष, बुलडाण्यातील सभेत भाजप अध्यक्ष अमित शाहांची टीका https://bit.ly/2M6ZUG7
- 'करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव', शिरुर येथील सभेत सर्जिकल स्ट्राईकवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा भाजपवर निशाणा https://bit.ly/2oo5ye9
- मूर्तिजापूरमधल्या सभेत प्लास्टिक वापरल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपालिकेकडून 10 हजारांचा दंड https://bit.ly/2VwUgAa , तर परवानगीशिवाय सोशल मीडियावर प्रचार केल्याप्रकरणी नांदेडच्या 12 व्हॉट्सअप ग्रुपला नोटीस https://bit.ly/2p9L1Ka
- उल्हासनगरमध्ये महापालिकेच्या निवडणुकीत भाजपला मदत करुनही मुख्यमंत्र्यांनी दगा दिला, आमदार ज्योती कलानी यांची जाहीर नाराजी, उमेदवारीचे आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप https://bit.ly/2ozAHLp
- परतीच्या पावसामुळे सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यातील अग्रणी नदीला पूर, 25 वर्षात प्रथमच धोक्याची पातळी ओलांडली, नदी परिसरातील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना https://bit.ly/318dn4C
- एसटीच्या 20 टक्के कर्मचाऱ्यांनाच दिवाळी अॅडवान्सचा लाभ मिळणार, 10 हजार रुपये अॅडवान्स देण्याचा एसटी प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/35sGenB
- चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं चेन्नईच्या महाबलीपुरममध्ये जोरदार स्वागत, दहशतवाद, पाकिस्तानसह महत्वाच्या विषयांवर चर्चा https://bit.ly/2IJdCwN
- दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुणे कसोटीत कोहलीचं ‘विराट’ द्विशतक, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सात वेळा द्विशतकं ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज, भारताचा पहिला डाव 601 धावांवर घोषित https://bit.ly/35rJ8cw
- बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज 77वा वाढदिवस, महानायकावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव https://bit.ly/2oBxKtZ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बीड
राजकारण
क्राईम
Advertisement