एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 मे 2019 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 06 मे 2019 | सोमवार
1. लोकसभेसाठी पाचव्या टप्प्यात 51 जागांसाठी मतदान, राहुल गांधी, स्मृती इराणी, राजनाथ सिंहांसह दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद, तर मतदानावेळी पश्चिम बंगालमध्ये भाजप-तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 60 टक्के मतदानाची नोंद https://bit.ly/2LqaedS
2. वैद्यकीय शिक्षणात आरक्षण नसल्याने मराठा विद्यार्थ्यांचे मुंबईत आंदोलन, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर विद्यार्थ्यांचं आंदोलन तुर्तास स्थगित, आरक्षणाच्या स्थगितीविरोधात सुप्रीम कोर्टात सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://bit.ly/2Jk1m79
3. दुष्काळी भागात चारा छावण्यांमधील पशुधनाच्या आहारात वाढ, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, नोंदीसाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्याचेही निर्देश https://bit.ly/2LlDoLg
4. आचारसंहिता शिथिल करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मान्य https://bit.ly/2VKwvHr, मात्र गिरीश महाजनांच्या नाशिकमधील दुष्काळ दौऱ्यात आचारसंहितेचं कारण देत अधिकाऱ्यांची दांडी https://bit.ly/2vHpAju
- सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर, तब्बल 13 विद्यार्थ्यांना 500 पैकी 499 गुण, ठाण्यातल्या दोघांना आणि नवी मुंबईतल्या एका विद्यार्थ्याला 497 गुण https://bit.ly/3015OO0
- अकोल्यात प्रॉपर्टी ब्रोकरची दिवसाढवळ्या हत्या, भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्षावर हत्येचा संशय, शिक्षण संस्थेच्या मालकी वादातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती https://bit.ly/2VivCq7
- अहमदनगरमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती, आंतरजातीय विवाह केल्याने बापाने मुलीसह जावयाला पेटवलं, मुलीचा मृत्यू तर जावईही गंभीर जखमी, आरोपी बाप फरार https://bit.ly/2V3BluU
- येवल्यात तीन लाखांच्या पैठणींवर चोरट्यांचा डल्ला, साड्या चोरल्यानंतर सीसीटीव्हीसमोर चोरांचा डान्स, तर धुळ्यात एटीएम मशीन समजून पासबुक प्रिटिंग मशीनची चोरी https://bit.ly/2DSMlp9
- पुण्यात सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ, एकाच दिवसात तब्बल सहा महिलांची मंगळसूत्र लांबवली, चोरटे सीसीटीव्हीत कैद https://bit.ly/2V79ERP
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement