एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2020 | बुधवार
1. अधिवेशन संपण्यापूर्वी राज्यात 'दिशा' कायद्याच्या धर्तीवर कायदा होणार, महिला अत्याचारांच्या घटनांसंदर्भात बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती https://bit.ly/2T08qdp
2. राज्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या 305 शाळा बंद होणार, राज्य सरकारचा निर्णय, शिक्षक संघटनांचा विरोध तर शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन की ऑफलाईन? 3 मार्चला येणार अभ्यास गटाचा अहवाल https://bit.ly/2PqwO5H
3. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळल्यानंतर विधानसभेत गदारोळ, शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपची रणनिती, सावरकरांवर अवमानकारक लेख प्रसिद्ध करणाऱ्या 'शिदोरी' मासिकावर बंदी घालण्याची मागणी https://bit.ly/39YMrJE
4. शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना अटक, भोसलेंसह चौघांना न्यायालयाकडून 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी https://bit.ly/2HX7n7R
5. मीरा- भाईंदर महापौर निवडणुकीत भाजपने गड राखला, ज्योत्स्ना हसनाळे यांची महापौरपदी निवड तर उपमहापौरपदी हसमुख गेहलोत https://bit.ly/2PosbcE
6. दिल्लीतल्या हिंसाचारप्रकरणी गृहमंत्री अमित शाहांनी राजीनामा द्यावा, काँग्रेसची मागणी, सोनिया गांधी उद्या राष्ट्रपतींना भेटणार, हिंसाचारात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू https://bit.ly/3ccguPJ
7. गॅंगस्टर छोटा राजनच्या निशाण्यावरुन दाऊद थोडक्यात बचावला होता, शूटरच्या टीमसोबत असलेल्या एजाज लकडावालाची माहिती https://bit.ly/2HVRhL
8.वाघिणीसारखी झडप घालून चोरट्याला पकडलं, विदर्भ क्रिकेट संघाची यष्टीरक्षक सलोनी अलोटच्या धाडसाचं कौतुक https://bit.ly/2Pqq0oC
9. बालाकोट एअर स्ट्राईकला एक वर्ष पूर्ण, हवाई दलाने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून 'जैश'च्या चौक्या केलेल्या उद्धवस्त
10. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकत स्टीव्ह स्मिथची टेस्ट रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर झेप, जसप्रीत बुमराहलाही फटका https://bit.ly/2Tfqa3n
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप- http://m.helo-app.com/al/mUfSswxex