एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 26 नोव्हेंबर 2018 | सोमवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 26 नोव्हेंबर 2018 | सोमवार
- मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण मिळण्याची शक्यता, एबीपी माझाच्या विश्वसनीय सूत्रांची माहिती, 29 आणि 30 तारखेला विधिमंडळात चर्चा, 30 नोव्हेंबरला मंजुरी अपेक्षित, पाच दिवसात वैधानिक प्रक्रिया पूर्ण करुन 5 डिसेंबरपासून अंमलबजावणी https://goo.gl/Py5uyN
- मराठा आरक्षण विधेयक 29 नोव्हेंबरला विधानभवनाच्या दोन्ही सभागृहात पटलावर, चर्चाही होणार, मराठा आरक्षणावर गदारोळानंतर सरकारचा निर्णय https://goo.gl/TVCBGK
- आरक्षणप्रश्नी निघालेली संवाद यात्रा विधान भवनावर धडकण्याआधीच मराठा कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड, प्रतिबंधात्मक कारवाई असल्याचा पोलिसांचा दावा https://goo.gl/DJKPsi
- देशावरील सर्वात मोठ्या 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला 10 वर्षे पूर्ण, हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यांना अमेरिकेकडून बक्षीस जाहीर, हल्ल्याचा साक्षीदार नरिमन हाऊसचं नावही बदललं! https://goo.gl/wySKSN
- राज्यात दुष्काळ जाहीर, मात्र अंमलबजावणी नाहीच, दुष्काळी भागाला आवश्यक मदत आणि सवलती मिळत नसल्याचं समोर, विरोधकांकडूनही टीका https://goo.gl/wQoz8J
- अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीकडून बेदम मारहाण, एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, दोन पोलीस जखमी, नागपूरमध्येही पोलिसावर करवतीने हल्ला, आरोपी फरार https://goo.gl/LAo4q2
- हरिश्चंद्रगडावर अडकलेल्या कल्याणच्या 20 ट्रेकर्सची अखेर सुटका, शनिवारी अंधारामुळे रस्ता चुकलेल्या ट्रेकर्सना शोधण्यात यश https://goo.gl/U8YvCX
- विदेशातून भारतात आणलेल्या काळ्या पैशांची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाचा नकार, केंद्रीय माहिती आयोगाच्या प्रस्तावाला पीएमओचं उत्तर https://goo.gl/icPqaW
- दिल्लीत पुन्हा 'मॉब लिंचिंग', बॅटरी चोरीच्या संशयाने जमावाची मारहाण, एकाचा मृत्यू https://goo.gl/KbN52V
- चित्रपट क्षेत्रातल्या भरीव योगदानाबद्दल प्रसिद्ध संवाद लेखक सलीम खान यांचा गौरव, गोव्यात सुरु असलेल्या इफ्फी महोत्सवात विशेष पुरस्काराने सन्मान https://goo.gl/YuAmd6
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर
क्राईम
Advertisement