एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 ऑक्टोबर 2018 | बुधवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये

एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 24 ऑक्टोबर 2018 | बुधवार
- अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी जाणारी स्पीडबोट खडकावर आदळल्याने अपघात, बोटीतील सर्व 25 जण सुखरुप असल्याचा कोस्टगार्डचा दावा तर सिद्धेश पवार हा तरुण बेपत्ता असल्याची विनायक मेटेंची माहिती, पायाभरणीचा नियोजित कार्यक्रम रद्द https://goo.gl/aTKLki
- पायाभरणीसाठी जाणाऱ्या बोटीचा अपघात नियोजनशून्यतेमुळे, शेकापच्या जयंत पाटलांचा आरोप, स्वत:च्या दोन बोटी मदतकार्यासाठी पाठवल्या, तटरक्षक दलाला सोबत का घेतलं नाही? जयंत पाटलांचा सवाल https://goo.gl/aTKLki
- सीबीआयमधील वाद टोकाला, सीबीआय संचालक आलोक शर्मा आणि राकेश अस्थाना सक्तीच्या रजेवर, एम. नागेश्वर राव नवे प्रभारी संचालक, संचालकांवरील आरोपांचा तपास CVC च्या देखरेखीखाली होणार https://goo.gl/rFu7iB
- मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळणार, वरच्या धरणातील पाणी सोडण्याविरोधातील याचिका ऐकण्यास हायकोर्टाचा नकार, जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा https://goo.gl/9rBMMC
- विचारवंताच्या अटकेसंदर्भात राज्य सरकारला दणका, पुणे कोर्टाने सुरेंद्र गडलिंग यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी दिलेली मुदतवाढ हायकोर्टाकडून रद्द, राज्य सरकार तातडीने सुप्रीम कोर्टात जाणार https://goo.gl/8uM38J
- तेलंगणात सापडलेल्या 10 कोटींचं नागपूर कनेक्शन, नागपुरातील मस्कासाथ परिसरात आयकर विभागाचे छापे, अनेक खासगी लॉकर्स आढळले https://goo.gl/NWYVJR
- देशभरात 31 मार्च 2020 पासून BS-IV वाहनांची विक्री बंद, सुप्रीम कोर्टाचे आदेश, BS-VI चा वापर अनिवार्य होणार https://goo.gl/oKZ4ZV
- जम्मू काश्मीरमध्ये पाकच्या 'नापाक' हरकती सुरुच, पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारतीय सेनेच्या मुख्यालयावर ग्रेनेडचा हल्ला https://goo.gl/9RS8Wd
- अभिनेता इरफान खान सात महिन्यांच्या उपचारानंतर मायदेशात परतणार, लंडनमध्ये न्यूरोएन्ड्रोक्राईन ट्यूमरवरील उपचार पूर्ण, 'हिंदी मीडियम-2' च्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात https://goo.gl/WQafYZ
- भारत वि. विंडीज दुसऱ्या विशाखापट्टणम वन डे सामन्यात विराट कोहलीची नाबाद 157 धावांची खेळी, 50 षटकात भारताच्या 6 बाद 321 धावा, वन डे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान दहा हजार धावा करत कोहलीकडून सचिनचा विक्रम मोडित https://goo.gl/c6ovis
आणखी वाचा























