एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/06/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 23/06/2018
- महाराष्ट्रात आजपासून प्लास्टिकबंदी लागू, प्रतिबंधित प्लास्टिक बाळगल्यास 5 हजारांचा दंड https://goo.gl/DKKvzx
- प्लास्टिकबंदीनंतर पुण्यात 73 जणांकडून 3 लाख 69 हजारांचा दंड वसूल, तर नाशकात 72 जणांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड https://t.co/DCAeCIvsE9
- लग्नाला नकार दिला म्हणून 18 वर्षीय तरुणीला जिवंत जाळलं, वाशिम जिल्ह्यातील सावळ गावातील धक्कादायक प्रकार https://goo.gl/vcVUje
- पीककर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी, बुलडाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखाधिकाऱ्याविरोधात गुन्हा, स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक https://goo.gl/Ztzzpm
- शेतीच्या वादातून जन्मदात्या आईच्या अंगावर ट्रॅक्टर घातला, वाशिममधील घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, वादानंतर दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार https://goo.gl/TkWDmA
- एकाच कुटुंबातील 4 जणांची आत्महत्या, मुंबईतील वांद्र्याच्या शासकीय वसाहतीतील घटना, आर्थिक चणचण आणि तणावामुळे आयुष्य संपवल्याचा अंदाज https://goo.gl/qU7HhJ
- रायगडच्या महडमधील विषबाधा प्रकरणाचं गूढ अखेर उकललं, रंगावरुन हिणवतात म्हणून महिलेने घरगुती कार्यक्रमातील जेवणात विष टाकलं, 120 जणांना विषबाधा, 5 जण दगावले https://goo.gl/JVnU3i
- सर्पदंशानंतर तोच साप घेऊन रुग्णालय गाठलं, एका हातात साप घेऊन तरुणाने उपचार घेतले, बीडमधील अजब घटना https://goo.gl/h9q9xD
- दहशतवाद्यांचे मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्याऐवजी थेट अज्ञातस्थळी पुरणार, भारतीय सैन्याचा महत्त्वपूर्ण निर्णय https://goo.gl/TyPbnE
- क्या नाटक कर रहा है, मुझे देख क्यो नहीं रहा?, वाहतूक नियमांच्या जागृतीसाठी 'धडक'च्या डायलॉगचं मीम, मुंबई पोलिसांची अनोखी शक्कल https://goo.gl/6dBxr2
- मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकजवळ एसटी आणि क्रुझरमध्ये भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू https://goo.gl/95v94g
- डीएसके प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांवरील कारवाई पोलिसांच्या 'अंगलट' येण्याची शक्यता, राष्ट्रीयीकृत बँकेच्या अध्यक्षांविरूद्ध कारवाई करण्यापूर्वी रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणं बंधनकारक https://goo.gl/EXmCBV
- दुबईत व्हिसाविना दोन दिवस राहता येणार, यूएई सरकारचा भारतीय पर्यटकांसाठी मोठा निर्णय https://goo.gl/iE8abM
- कोकणासह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागात पावसाला सुरुवात, अनेक रस्ते जलमय, काही गावांना पुराचा तडाखा https://goo.gl/G8uE4h
- द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर सिनेमातील वाजपेयींचा लूक समोर, राम अवतार भारद्वाज साकारणार अटल बिहारी वाजपेयींची भूमिका, अनुपम खेर यांच्याकडून फोटो ट्वीट https://goo.gl/57smuE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement