एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 सप्टेंबर 2019 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 सप्टेंबर 2019 | शुक्रवार
1. युतीत खळखळ नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंकडून लोकसभेच्या फॉर्म्युल्याची आठवण, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची यादी ठरवल्यानंतर पुढचा निर्णय घेणार
2. विधानसभेसाठी मनसे 100 जागांवर उमेदवार उभे करणार, सूत्रांची माहिती, विभागप्रमुखांच्या बैठकीत रणनितीवर खलबतं
3. काँग्रेसच्या 50 उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार, संभाव्य यादीत धीरज देशमुख, ऋतुराज पाटलांचा समावेश असण्याची शक्यता
4. साडेचार वर्षात सवर्ण आणि अनुसूचित जातींमधला तणाव वाढला, महाराष्ट्र पोलिसांचा निवडणूक आयोगाकडे अहवाल सादर, 14 जिल्हे संवेदनशील म्हणून घोषित
5. किरकोळ बाजारात कांद्यानं साठी गाठली, नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक मंदावली, शेतकरी समाधानी
6. 10 दिवसांत खड्डे बुजवले नाही तर कारवाई अटळ, एबीपी माझाच्या मोहीमेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा, खड्डे बुजवायला सुरुवात
7. मंदीवर उतारा म्हणून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून कॉर्पोरेट टॅक्समध्ये जवळपास 10 टक्क्यांची कपात, शेअर बाजारात विक्रमी उसळी
8. माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांना बलात्काराच्या आरोपात अटक, एसआयटी आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई
9. नालासोपाऱ्यात दिवसाढवळ्या गोल्ड बँकेवर सशस्त्र दरोडा, 1.75 कोटींचं सोनं लुटलं, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु
10. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनीची साथ मिळाल्यामुळेच विराट कोहली सर्वोत्तम कर्णधार ठरला, माजी सलामीवीर गौतम गंभीरने विराटचे कान टोचले
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
बीड
राजकारण
Advertisement