एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 जुलै 2019 | शनिवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 20 जुलै 2019 | शनिवार
1. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन, दीर्घकाळाच्या आजाराने वयाच्या 81 व्या वर्षी दिल्लीत अखेरचा श्वास
2. अखेर 26 तासांनंतर प्रियांका गांधींची सोनभद्रप्रकरणातील पीडितांच्या कुटुंबियांशी भेट, धरणं आंदोलन मागे, काँग्रेसकडून 10 लाखांच्या मदतीची घोषणा
3. राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, नाशिकच्या विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरेंना विश्वास, तर आगामी काळात आदित्य हे शिवसेनेचं नेतृत्व राऊतांचा दावा
4. पुणे-सोलापूर रस्त्यावर कारचा भीषण अपघात, पुण्यातल्या नऊ महाविद्यालयीन तरुणांवर काळाचा घाला, तर बीडमध्ये वाहनाच्या धडकेत तीन शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू
5. आषाढी यात्रेत विठुरायाचा खजिना भरला, विठुरायाचरणी तब्बल 4 कोटी 40 लाख रुपयाचं दान, गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड कोटी रुपयांनी उत्पन्न वाढलं
6. हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गाव विक्रीला, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून ग्रामस्थांचा निर्णय, सरकारकडे इच्छामरणाचीही मागणी
7. नाणार प्रकल्पाच्या समर्थनात रत्नागिरीत नागरिकांचा मोर्चा, राजापूरसह रत्नागिरी शहरात बंदची हाक, भाजपचा पाठिंबा तर शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष
8. औरंगाबादमध्ये मुस्लीम तरुणाला जय श्रीराम म्हणायला लावत मारहाण करणाऱ्या एकाला अटक, चार ते पाच जण फरार
9. उत्तरप्रदेशच्या राज्यपालपदी आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती, बिहार, मध्यप्रदेश, त्रिपुरा, नागालँडसह एकूण 6 राज्यांचे राज्यपाल बदलले
10. टीम इंडियाच्या विंडीज दौऱ्यातून महेंद्रसिंह धोनीची माघार, क्रिकेटमधून दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन प्रादेशिक सेनेचं कर्तव्य बजावणार
*माझा कट्टा* : प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याशी सुरेल गप्पा आज रात्री 9 वाजता माझा कट्ट्यावर
*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*मेसेंजर* m.me/abpmajha
*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement