एक्स्प्लोर
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 एप्रिल 2019 | शुक्रवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 19 एप्रिल 2019 | शुक्रवार*
- हेमंत करकरेंना मी शाप दिला होता, म्हणून त्यांचा दहशतवादी हल्ल्यात सर्वनाश झाला, भोपाळची भाजपची उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंहचं वादग्रस्त वक्तव्य https://bit.ly/2UIuUCe
- मुख्यमंत्र्यांवर दिल्लीतून प्रेशर, राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची खटपट, मनसेचे नेते अभिजीत पानसेंचा आरोप https://bit.ly/2IHXD2L
- काँग्रेसला धक्का, माजी राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांचा शिवसेनेत प्रवेश https://bit.ly/2V9wWe5 तर बीडमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, आमदार जयदत्त क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता https://bit.ly/2GxNBQy
- बहीण प्रिया दत्तच्या प्रचारासाठी अभिनेता संजय दत्त मैदानात उतरणार, उत्तर मध्य मुंबईतील सहा विधानसभा मतदारसंघात प्रिया यांच्यासाठी रोड शो करणार https://bit.ly/2GuyyXA
- गुजरातमध्ये भाषणावेळी हार्दिक पटेल यांच्या कानशिलात, पाटीदार आंदोलनात कुटुंबाला झालेल्या त्रासामुळे कानाखाली लगावली, हल्लेखोराची संतप्त प्रतिक्रिया https://bit.ly/2PnyY56
- चुकून भाजपला मतदान केलं, बसप कार्यकर्त्यांने स्वत:चं शाई लावलेलं बोटच कापून काढलं, उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील घटना https://bit.ly/2Pi8iT8
- डॉक्टर आणि रुग्णाचे लैंगिक संबंध परस्पर संमतीने आले तरी ते अनैतिकच, मेडिकल कौन्सिलची नवी नियमावली https://bit.ly/2Dyyogf
- काँग्रेसचे दिवंगत नेते एनडी तिवारी यांच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल, पोस्टमॉर्टेम अहवालात रोहित शेखरचा गुदमरुन मृत्यू झाल्याचा संशय https://bit.ly/2GlmUNA
- प्रेक्षक-समीक्षकांनी 'धू-धू' धुतलेल्या 'कलंक'ची बॉक्स ऑफिसवर 'धो धो' कमाई, 2019 मधील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट, पहिल्या दिवशी 21.60 कोटींची कमाई https://bit.ly/2ZkUSdA
- राज्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी, नाशिकच्या अंजनेरीत पहाटेपासून भाविकांची गर्दी, तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात रुईच्या पानांची सजावट https://bit.ly/2IF67Yq
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
भारत
शेत-शिवार
Advertisement