एक्स्प्लोर
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/07/2018
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 18/07/2018
- तिसऱ्या दिवशीही दूध आंदोलन सुरुच, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा राजू शेट्टींचा इशारा, पुण्यात दुधाचा तुटवडा, गुजरातवरुन येणारं दूध रोखण्यासाठी राजू शेट्टी डहाणू स्टेशनवर https://goo.gl/AkW6Fz हिंसक आंदोलकांवर कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा https://goo.gl/SVmHpT
- मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव, विरोधकांना अविश्वास प्रस्ताव सादर करण्यास लोकसभा अध्यक्षांकडून मंजुरी, शुक्रवारी चर्चा https://goo.gl/A199t5
- सिंचनासाठी केंद्र सरकारची मोठी घोषणा, महाराष्ट्राला 1 लाख 55 हजार कोटी रुपये देण्याची नितीन गडकरींची घोषणा, मराठवाडा-विदर्भातील 91 प्रलंबित प्रकल्पांचं काम युद्धपातळीवर करणार https://goo.gl/Zr2RK7
- माणिकराव ठाकरेंचा मुदतीपूर्वीच उपसभापतीपदाचा राजीनामा, काँग्रेसने विधान परिषदेचे तिकीट न दिल्याने नाराजी https://goo.gl/G7c9Y6
- राज्यात पहिलीच्या प्रवेशाचं वय सहा वर्षेच राहणार, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडेंचं स्पष्टीकरण, स्पर्धा परीक्षेत नुकसान होत असल्याचा दावा फेटाळला https://goo.gl/ij25bm
- छगन भुजबळांना शिवीगाळ करणाऱ्या श्रीगोंद्याच्या पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, विधानसभेत विशेष हक्कभंग सादर https://goo.gl/erzaSm
- ऐन पावसाळ्यात धुळे जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, दीड महिन्यात फक्त १७० मिलीमीटर पाऊस, तर मनमाडमध्ये महिन्यातून फक्त दोनदा पाणीपुरवठा https://abpmajha.abplive.in/
- मुंबईतील माटुंगा रोड स्टेशनजवळील पादचारी पुलाला तडे, खबरदारीचा उपाय म्हणून पुलावरील रहदारी बंद https://goo.gl/Ht3mms
- वाहनं चालवताना यापुढे कागदपत्र जवळ बाळगण्याची गरज नाही, डिजिटल यंत्रणेद्वारे फोनमधूनच दस्तऐवज दाखवता येणार, लवकरच केंद्र सरकार निर्णय घेणार https://goo.gl/JLUugJ
- जळगावच्या अंतुर्लीत केळी शीतगृहातील स्फोटात तिघांचा मृत्यू, ईथिलीन सिलिंडरच्या स्फोटामुळे घटना घडल्याचा अंदाज https://abpmajha.abplive.in/
- नवी मुंबईतील वाशीमध्ये एमजीएम रुग्णालयावर सायबर हल्ला, बिटकॉईनद्वारे खंडणीची मागणी https://goo.gl/pXZzRS
- ग्राहकांसाठी खुशखबर, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घट, येत्या काळात दर आणखी घसरण्याची शक्यता https://goo.gl/Qqg8Em
- इंग्लंडविरुद्धच्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, ऋषभ पंतला संधी, करुण नायरचंही कमबॅक https://goo.gl/R9X9qa
- इंग्लंड दौऱ्यानंतर महेंद्रसिंह धोनीचे निवृत्तीचे संकेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या चर्चेला क्रीडाजगतात उधाण https://goo.gl/KikJtt
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
जळगाव
भविष्य
क्रिकेट
Advertisement