एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2020 | शनिवार
- देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात, नागपूर आणि यवतमाळमधील नव्या रुग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 22 वर, संसर्ग रोखण्याचं आव्हान वाढलं https://bit.ly/3aYucEL
- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लग्नकार्य पुढे ढकला, मोठ्या समारंभाऐवजी प्रशासनाकडून रजिस्टर मॅरेजचा पर्याय, सुट्ट्यांमध्ये मुलांना घरातच ठेवण्याची विनंती https://bit.ly/2wVFPgZ
- ग्रामपंचायत क्षेत्र वगळता महाराष्ट्रातल्या सर्व शाळा आणि कॉलेज उद्यापासून बंद , कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय, मात्र दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार https://bit.ly/38UkzVT
- कोरोनामुळे मनसेचा गुढीपाडव्याचा मेळावा रद्द, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वार्षिक शिबिरही स्थगित https://bit.ly/3aWvfoE
- कोरोना व्हायरसचा गंभीर परिणाम, सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ, तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांकडे नागरिकांची पाठ https://bit.ly/38PKf6f
- कोरोना व्हायरसवर लवकरच लस येणार; विषाणू शरीराबाहेर ठेवण्यात पुण्यातील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी संस्थेला यश, पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची माहिती https://bit.ly/2IKyAej
- महिला सुरक्षाविषयक दिशा कायदा आणण्यावर ठाकरे सरकार ठाम, कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर विशेष अधिवेशन बोलवणार, गृहमंत्री अनिल देशमुखांची माहिती https://bit.ly/38QgVMI
- अलिबागजवळ समुद्रात खडकावर आदळून प्रवासी बोट उलटली, मरिन पोलिसांनी सर्व 88 प्रवाशांना वाचवलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून पोलिसांचं कौतुक https://bit.ly/2WbMXQJ
- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट, मात्र सरकारकडून इंधन दराच्या उत्पादन शुल्कात 3 रुपयांनी वाढ, सामान्यांच्या खिशाला कात्री https://marathi.abplive.com/
- येस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, 18 मार्चपासून बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा उठवली जाणार https://bit.ly/2U3weg0
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement