एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 9 नोव्हेंबर 2018 | शुक्रवार
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटिनमध्ये
एबीपी माझा व्हॉट्सअप बुलेटिन | 9 नोव्हेंबर 2018 | शुक्रवार
- जायकवाडीत फक्त 3.9 टीएमसी पाणीच पोहोचलं, मुळा, दारणा, पालखेड धरणातून विसर्ग बंद, निळवंडेतून सुरु असलेला विसर्गही लवकरच बंद होणार https://goo.gl/7WYhGF
- सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन चिघळलं, आष्टा-मिरज-इस्लामपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जाळपोळ आणि तोडफोडीचे प्रकार https://goo.gl/1Q9Wn5
- दोन अत्याधुनिक विदेशी तोफा लष्करात दाखल, 'होवित्झर आणि वज्र'चं हस्तांतरण, देवळाली कॅम्पमध्ये भारतीय सैन्याचं शक्तीप्रदर्शन https://goo.gl/kyASVG
- चाळीसगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद, हनीट्रॅप लावून जेरबंद करण्यास वनविभागाला यश https://goo.gl/BA1Aj8
- अवनी वाघिणीला मारण्याचं राजकारण केलं जातंय, नितीन गडकरींकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची पाठराखण, राजीनामा मागणं चुकीचं असल्याचंही वक्तव्य https://goo.gl/qLTmPB
- एकीकडे शहरी नक्षलवादाचं समर्थन, दुसरीकडे नक्षल्यांवर कारवाईच्या बाता, छत्तीसगडमध्ये पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात, तर राहुल गांधींचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंगांवर जोरदार टीकास्त्र https://goo.gl/7KsfWs
- चीन भारताकडून वीस लाख टन कच्ची साखर खरेदी करणार, देशभरातील ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा https://goo.gl/gtNmyG
- मराठी रंगभूमीवरच्या एका बंडाचा शेवट, ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचं निधन, वयाच्या 79 वर्षी अखेरचा श्वास https://goo.gl/Caxwj8
- ठग्स ऑफ हिंदोस्तानमुळे अभिनेते आमीर खान आणि अमिताभ बच्चन सोशल मीडियावर ट्रोल, तरीही 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान'ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई https://goo.gl/BU8XeM
- वेस्ट इंडिजमधल्या महिलांच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकाला आजपासून सुरुवात, हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाचा सलामीचा सामना न्यूझीलंडशी https://goo.gl/r3nU67
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement