एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/12/2017
राज्यासह देशविदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या व्हॉट्सअॅप बुलेटीनमध्ये
एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 06/12/2017
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमीवर भीमसागर https://goo.gl/zBQQ6q महिनाभरात इंदू मिल स्मारक कामाला सुरुवात, मुख्यमंत्र्यांची घोषणा
- दलित युवक-युवतीशी लग्न केल्यास अडीच लाख रुपये, आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय https://goo.gl/FVxHiN
- विराट कोहली आणि अनुष्का शर्माचं लग्न या आठवड्यातच होण्याची चिन्हं, इटलीत 9 ते 11 डिसेंबरदरम्यान विवाह सोहळा रंगण्याची शक्यता https://goo.gl/sAz9TP
- भारत-श्रीलंका यांच्यातील तिसरी दिल्ली कसोटी अनिर्णित, श्रीलंकेची चिवट फलंदाजी, भारताने कसोटी मालिका 1-0 ने जिंकली, सलग नववी कसोटी मालिका जिंकून टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या पंक्तीत https://goo.gl/5UU3yt
- राज्यातील केंद्रीय कार्यालयांसह सर्वच ठिकाणी त्रिभाषा सुत्रानुसार मराठी भाषा बंधनकारक, शासन निर्णय जारी https://goo.gl/pNKsTK
- भाजप नेते यशवंत सिन्हा यांचं अकोल्यातील आंदोलन तिसऱ्या दिवशी मागे, मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा, सर्व मागण्या मान्य https://goo.gl/r8fshM
- भिवंडीत 11 गोदामांना भीषण आग, लाखोंचा ऐवज जळून खाक, सकाळी लागलेली आग विझवण्यासाठी आणखी दोन दिवस लागण्याची शक्यता https://goo.gl/ZEkYWx
- विधानपरिषदेच्या एका जागेसाठी उद्या निवडणूक, काँग्रेस-भाजपची प्रतिष्ठा पणाला https://goo.gl/igxMfe, तर भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांच्याकडून युतीच्या आमदारांना ‘पंचतारांकित’ स्नेहभोजन https://goo.gl/3vkXeG
- गडचिरोलीमधील अहेरीत 7 नक्षलवाद्यांना कंठस्नान, सी कमांडो-60 च्या पथकाकडून नक्षली हल्ल्याचा चोख बदला https://goo.gl/DNtZP8
- 'रेरा' ग्राहकांच्या हिताचाच, हायकोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या, सर्वसामान्य नागरिकांना स्वत:चं घर विकत घेण्याच्या स्वप्नाला नवं बळ https://goo.gl/NoN2Wd
- फारुख अब्दुल्लांच्या आव्हानाला शिवसेनेचं उत्तर, लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न, शिवसेनेचे 9 कार्यकर्ते अटकेत https://goo.gl/2hBVTu
- रिझर्व बँकेकडून द्वैमासिक पतधोरण जाहीर, रेपो दर 6 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 5.75 टक्के कायम https://goo.gl/sb6gUL
- यूट्यूब व्हिडिओ पाहून एटीएमवर दरोडा, रातोरात लखपती होण्याचा प्लॅन फसला, नाशिकमध्ये दोन उच्चशिक्षित तरुण अटकेत https://goo.gl/ZdBN1c
- भीम अॅपवरुन रेल्वे तिकीट बुक करा, मोफत प्रवासाची संधी मिळवा, IRCTC वर भीम अॅपद्वारे तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेची नवी ऑफर https://goo.gl/pr5BKD
- चंद्रपुरात घरात घुसलेल्या चोरावर त्याच्याच चाकूने वार, चोराचा मृत्यू, कुटुंबातील चौघे अटकेत https://goo.gl/fkkV9Q
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जॅाब माझा
भविष्य
Advertisement