एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जुलै 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- पंढरीत यावर्षी वारकऱ्यांविना आषाढीचा सोहळा...! मुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक शासकीय महापूजा, महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याचं मुख्यमंत्र्याचं पांडुरंगाला साकडं... विठ्ठल मंदिरातील विणेकरी विठ्ठल बडेंना मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय पूजेत सहभागी होण्याचा मान https://bit.ly/3eSV5we
- यंदा लालबागच्या राजाचा गणपती नाही; लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ऐतिहासिक निर्णय.. यावर्षी गणेशोत्सव नाही तर रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन कँपचं आयोजन करुन आरोग्यउत्सव साजरा करणार https://bit.ly/2YPcGzx
- मुंबईत 15 जुलैपर्यंत कलम 144 लागू! जमावबंदीसह नाईट कर्फ्यू, जीवनावश्यक सेवा वगळता रात्री नऊ ते पहाटे पाचपर्यंत घराबाहेर पडण्यास मनाई कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/2NKjCHJ
- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवलीतही 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन, महापालिका प्रशासनाकडून नियमावली जाहीर, फक्त जीवनाश्यक बाबींसाठी सवलत https://bit.ly/2NXD97T
- पाकिस्तानकडून हल्ल्याच्या धमकीनंतर मुंबईत हाय अलर्ट; 191 ठिकाणी नाकाबंदी.. प्रमुख धार्मिक स्थळे, पंचतारांकित हॉटेल, महत्त्वाची सरकारी आणि बिगर सरकारी ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ https://bit.ly/2YLVNpf
- कोरोनावरील औषधावरुन झालेल्या टीकेनंतर बाबा रामदेव यांची माध्यमांवरच आगपाखड, देशात आयुर्वेदावर काम करणं अपराध असल्याची खंत, कोरोनावर पतंजलीचं औषध येऊ नये यासाठी ड्रगमाफिया सक्रिय झाल्याचा आरोप https://bit.ly/31zBPji
- केंद्रीय लोकसेवा आयोगाचा महत्वाचा निर्णय, UPSC अंतर्गत चार ऑक्टोबरला होणाऱ्या पात्रता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मूभा https://bit.ly/38glykR
- तामिळनाडूतील न्यूवेली औष्णिक विद्युत केंद्रात बॉयलरचा स्फोट; सहा जणांचा बळी, सोळा जण जखमी.. तामिळनाडूत दोन महिन्यातली बॉयलर स्फोटाची दुसरी घटना https://bit.ly/2YPQhBS
- जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये सीआरपीएफच्या पेट्रोलिंग पथकावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद https://bit.ly/2Zxnem6 तर दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीदरम्यान जवानाने चिमुकल्याला वाचवलं! जवान आणि चिमुकल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल https://bit.ly/3eQi4Yz
- टिकटॉकवरील बंदीनंतर भारतीय अॅप 'चिंगारी' टेंड्रींगमध्ये; आतापर्यंत अडीच कोटींहून अधिक युजर्सकडून डाऊनलोड https://bit.ly/2VxeIC3
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भारत
निवडणूक
Advertisement