एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार; 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि सात नोव्हेंबरला मतदान होणार तर 10 नोव्हेंबरला निकाल https://bit.ly/2RZhVs0
- सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम नावावर असणारे एस पी बालसुब्रमण्यम यांचं निधन, चेन्नईत वयाच्या 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/2SbuQaF
- कृषी विधेयकांविरोधात 250 शेतकरी संघटनांकडून भारत बंदची हाक, राजू शेट्टींकडून कृषी विधेयकाच्या प्रतींची होळी, विनोद तावडेंचा पवारांवर हल्लाबोल https://bit.ly/3081RsG
- आरक्षणासाठी धनगरांचं राज्यभर ढोल बजाओ आंदोलन, आरक्षणासाठी अध्यादेशाची मागणी, तर सांगलीतही शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा समाजाचा ठिय्या https://bit.ly/2EAUCSo
- 'बिहारमध्ये कोरोना संपला का?' निवडणूक जाहीर झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांचा सवाल https://bit.ly/364or9e
- "समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचं ऐकावं लागतं" पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याबाबतचं ट्वीट डिलीट केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया https://bit.ly/368BDdk
- 2018 मध्ये रियासोबत ड्रग्जसंदर्भात झालेलं व्हॉट्सअॅप चॅट रकुलप्रितला मान्य, एनसीबी सूत्रांची माहिती, मात्र ड्रग्जसेवनाचा आरोप फेटाळला https://bit.ly/33TlfdS
- एनसीबीच्या ताब्यातील क्षितीज रवी हा शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसचा पूर्वकर्मचारी, एनसीबीचा तपास रेड चिलीपर्यंत जाऊन पोहोचणार का याकडे सर्वांचं लक्ष https://bit.ly/2RUZipa
- 1 ऑक्टोबरपासून मुंबई एन्ट्री पॉईंटवर टोलसाठी जादा खिसा रिकामा होणार, 5 ते 25 रुपयांची टोलवाढ, तर मासिक पासही शंभर रुपयांनी महागला https://bit.ly/2RXAqgr
- साहित्य अकादमी पुरस्कार विजेता रोजंदारीवर, माझाच्या बातमीनंतर कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे नवनाथ गोरे यांना भारती विद्यापीठात नोकरी देण्याचं आश्वासन https://bit.ly/2HqWrlL
BLOG | साथिया... तूने क्या किया, एबीपी माझाचे प्रतिनिधी अमोल किन्होळकर यांचा लेख https://bit.ly/3082xy4
BLOG | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : झुंजार माणसा, झुंज दे… असं कृतीतून सांगणारा क्रिकेटर, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा लेख https://bit.ly/2HzZuIJ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
कोल्हापूर
नांदेड
महाराष्ट्र
Advertisement