एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 एप्रिल 2020 | शुक्रवार
- संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या वाधवान कुटुंबियांसह 23 जणांवर गुन्हा दाखल, प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर, पंधरा दिवसात चौकशी अहवाल https://bit.ly/39VJUPN वाधवान कुटुंबाला कुठेही जाऊ देऊ नका, सीबीआयची सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना https://bit.ly/2xmHn47
- वाधवान प्रकरणावरून किरीट सोमय्यांची शरद पवारांवर टीका https://bit.ly/3ee5ORG वाधवान कुटुंबियांचा क्वॉरन्टाईन संपला की आमच्या ताब्यात द्या, केंद्रीय गृहमंत्रालयाची राज्य सरकारला सूचना, सूत्रांची माहिती https://bit.ly/3cdNvup
- महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 162 रुग्ण, एकट्या मुंबईतच तब्बल 143 कोरोनाबाधित https://bit.ly/2Roh6ZW तर कोरोनामुळे देशात 6412 लोकांना संसर्ग, सहा राज्यात कोरोनाचे 65 टक्के रुग्ण, दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक प्रभाव https://bit.ly/2RrrwI6
- कोरोनामुळे जगभरात 97 हजार नागरिकांचा मृत्यू, अमेरिकेतील रुग्णांची संख्या चार लाख 68 हजारांवर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आयसीयूतून बाहेर https://bit.ly/2y6NERi
- पुण्यातील ससून रुग्णालयात 27 वर्षीय कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू https://bit.ly/2xiKLNl अकोल्यात साडेतीन महिन्याच्या बाळाला कोरोना तर सांगलीतील 24 जण कोरोनामुक्त https://bit.ly/2RvjQVA
- गुणवत्ता यादी लागूनही राज्यातील 129 परिचारिकांची नियुक्ती दोन वर्षांपासून प्रलंबित, राज्यातील 24 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये तब्बल 2700 परिचारिकांची पदे रिक्त https://bit.ly/3a4T4db
- चीन, अमेरिका आणि दक्षिण कोरिया पाठोपाठ भारतात कोरोनावर प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्यात येणार https://bit.ly/2Rr5Vji
- हिंदू व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी मुस्लिम बांधवांचा पुढाकार, नातेवाईक येऊ न शकल्याने मुस्लिम शेजाऱ्यांकडून हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार, मुंबई आणि सोलापुरात माणुसकीचं दर्शन https://bit.ly/2RonCjm
- कोरोनाविरुद्धच्या युद्धात आरोग्यासोबत पोलिस कर्मचारी आर्थिक संकटातही, रस्त्यावरची लढाई लढणारा पोलिस कर्मचारी पगाराविनाच, दहा तारीख उलटूनही पोलिसांना पगार नाही https://bit.ly/2VgmzTW
- लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मुलाला आणण्यासाठी आईचा दीड हजार किलोमीटरचा दुचाकीवरून प्रवास, पोलिस प्रशासनाकडून घेतली प्रवासासाठी परवानगी, आधुनिक हिरकणीची कहाणी! https://bit.ly/2VjEoS0
आणखी वाचा























