एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2020 | बुधवार #CycloneNisarga
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 जून 2020 | बुधवार
- मुंबईवरील चक्रीवादळाचा धोका टळला, वेधशाळेची माहिती; वाऱ्याचा वेग कमी झाला असून पुढील दोन तास जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता https://bit.ly/2zZA6s9
- निसर्ग चक्रीवादळाचं रौद्र रुप! कोकण किनारपट्टीला तडाखा, रायगड; अलिबाग, श्रीवर्धन ठाण्यासह किनारपट्टीवरील भागात प्रचंड नुकसान https://bit.ly/3gMLCI1
- वादळी वाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यात घरांचे पत्रे उडाले, वीजपुरवठा खंडीत, जीवितहानी नाही https://bit.ly/3eMykJW
- मुंबईतील काळाचौकी, सायन, विधानभवन परिसरात झाडं उन्मळून रस्त्यावर, पनवेलमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडं कोसळली https://bit.ly/2AAbtCx
- निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानं पुण्यात मुसळधार पाऊस, नाशिक, इगतपुरी, मालेगाव मार्गे वादळाचा प्रवास राहणार https://bit.ly/2zZA6s9
- आजचा दिवस 'निसर्गा'चा! चक्रीवादळासोबत राज्यातील अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं; सोसाट्याच्या वाऱ्याने घरांच्या पत्र्यांसह मोठमोठी झाडंही कोसळली https://bit.ly/2Mvs7pj
- आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या वाढदिवशी नियमबाह्य पद्धतीने महापालिकेच्या आवारातच शुभेच्छांचा फलक; नागपूरकरांचे आयुक्तांच्या कारवाईकडे लक्ष https://bit.ly/3csRoeB
- बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या धाकट्या भावावर पुतणीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप; दिल्लीच्या जामिया नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल https://bit.ly/3cqOHKp
- देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2 लाख पार, आतापर्यंत 5 हजार 815 जणांचा कोरोनानं मृत्यू तर 1 लाखाहून अधिकांची कोरोनावर मात https://bit.ly/2U1RcfS
- जगभरात कोरोनाचा कहर सुरूच, जवळपास 213 देशांमध्ये 65 लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग तर 30 लाख रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/2XS0aNU
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
गडचिरोली
राजकारण
राजकारण
Advertisement