एक्स्प्लोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2020 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- मुंबई लोकलमधून क्यूआर कोडशिवाय महिला प्रवाशांना प्रवास करण्याची रेल्वेची अनुमती; सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आणि सायंकाळी 7 नंतर प्रवास करण्याची मुभा, रेल्वेमंत्र्यांची ट्वीटरवर घोषणा https://bit.ly/3o9ek9S
- लॉकडाऊन संपला तरी कोरोनाचं संकट कायम; सर्वांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी सरकारची तयारी, देशवासीयांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन https://bit.ly/35dyNl2
- अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागात प्रशासन तर नाहीच शिवाय मुख्यमंत्र्यांकडूनही दिलासा नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी शरद पवारांवर असल्याची टीका https://bit.ly/37vyJzI
- अॅमेझॉन अॅपमध्ये आता मराठी भाषेचा पर्यायही मिळणार, मनसेच्या इशाऱ्याची अमेझॉनकडून दखल, अमेझॉनचे प्रतिनिधी आज मुंबईत मनसे नेत्यांना भेटणार https://bit.ly/37nwcrr
- दहावी-बारावी ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, 20 नोव्हेंबरपासून दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा होणार https://bit.ly/31roAAi
- नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये कांद्याचा घाऊक भाव 90 रुपयांच्या घरात; लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता, अतिवृष्टीमुळे आवक मंदावल्याने भाववाढ https://bit.ly/3mhbYUH
- गडचिरोली जिल्ह्यातील चकमकीत ठार झालेल्या 'त्या' पाचही नक्षलवाद्यांची ओळख पटली; 18 लाखांचे होते बक्षीस, पाच नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचाही समावेश https://bit.ly/3dTTFlv
- चालकाला हार्ट अटॅक आल्याने बेस्ट बसचा अपघात, ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने प्रवासी सुखरुप! https://bit.ly/3oaBX1y
- जन्मानंतर अवघ्या काही तासात आईनेच घेतला नवजात मुलीच्या गळ्याचा घोट; सांगलीतील धक्कादायक घटना https://bit.ly/3dHaEXX
- भारतात पहिल्यांदाच प्रायोगिक तत्वावर हिंगाची लागवड यशस्वी, आयातीचं अब्जावधी रुपयाचं परकीय चलन वाचणार! https://bit.ly/37mp7r1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
महाराष्ट्र
Advertisement