ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जून 2025 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जून 2025 | सोमवार
1. मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात, दरवाजात लटकून प्रवास करणारे प्रवासी कोसळले, चौघांचा मृत्यू; 9 जण जखमी, विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन लोकलमधील प्रवाशांची टक्कर https://tinyurl.com/3pe3kyep फुटबोर्डवर उभा राहून प्रवास, बॅगा एकमेकांना घासल्या गेल्या अन् आठजण खाली पडले, मुंबई रेल्वे अपघाताची स्टार्ट टू एंड स्टोरी https://tinyurl.com/a6c9d5h6 चार प्रवासी जिवानिशी गेले, तरी रेल्वे अधिकाऱ्यांना पत्ताच नाही, PRO म्हणाले, लटकलेल्या प्रवाशांची एकमेकांना टक्कर, त्यातूनच दुर्घटना! https://tinyurl.com/yc3as2mk
2. मुंबईतील रेल्वे अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; मुंबईतील लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार https://tinyurl.com/ybwfrmt9 शरद पवारांनी सांगितलं, लोकल रेल्वेंना तात्काळ दरवाजे बसवा, राज ठाकरे म्हणाले, लोक गुदमरुन मरतील! https://tinyurl.com/yvawtnsm रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा कशाला मागता, त्यापेक्षा त्यांनी जाऊन स्थिती बघावी; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले https://tinyurl.com/yjk9hkb9
3. मुंबईतील रेल्वे अपघातात एकटा कमावणारा मुलगा गेला, बहिणीचं लग्न राहिलं; 28 वर्षीय राहुलच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर https://tinyurl.com/3vjjn3hs डोंबिवलीत स्वप्नातील घर घ्यायला बाहेर पडला, आयटी इंजिनिअरचा ट्रेनमधून हात घसरला अन् मुंबईतील रेल्वे अपघातात जीव गमावला https://tinyurl.com/2j3b39fb वळण धोकादायक, पिक अवरमध्ये 6000 प्रवासी असल्याने लोकल एका बाजूला झुकते; प्रवासी संघटनेनं मांडलं वास्तव https://tinyurl.com/2rjhpkkr
4. पक्षाच्या वर्धापनदिनी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतली जातील, मग पुढचा निर्णय घेतला जाईल; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/56wz37tv राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चा, पण अजित पवारांनी शरद पवारांशेजारी बसणं टाळलं, नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/mrxf3db2
5. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने आव्हान निर्माण होतं असं कोणी म्हणत असेल तर तो कल्पना विलास, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य https://tinyurl.com/53eaxc7j शिवसेना-मनसे युतीची चर्चा सकारात्मक, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता किती टक्के? चंदूमामा म्हणाले, दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ https://tinyurl.com/y7pfrkuw
6. निलेश राणेंच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर, भावांमध्ये वादाची ठिणगी अन् नंतर ट्वीट डिलीट; अमोल मिटकरी म्हणाले, भावाने दिलेला सल्ला वडिलांच्या सल्ल्यानंतर सर्वोच्च https://tinyurl.com/ywy7zr8c तोडपाणीसाठी आमदार संदीप क्षीरसागरांनी कामे रोखल्याचा आरोप, तीन अधिकारी घरगड्यासारखं वागतात; बीडमध्ये सत्ताधाऱ्यांचंच आंदोलन https://tinyurl.com/5xzvkfw8
7. राज्यात पाऊस पुन्हा धो-धो बरसणार; 9 आणि 10 जून रोजी पुन्हा लावणार हजेरी; अर्ध्या महाराष्ट्रात असणार मुक्काम, कुठे काय शक्यता? पेरणीबाबत हवामानतज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती https://tinyurl.com/bdepnte8
8. POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय; मूर्तिकार अन् मंडळांना दिलासा https://tinyurl.com/4fcv2veu
9. इंदूरचे हनिमून कपल राजा रघुवंशी हत्येप्रकरणी मोठी अपडेट,पत्नीनेच मेघालयात हत्या केल्याचं उघड, हत्येसाठी सुपारी, आरोपी पत्नीचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण https://tinyurl.com/42bs38d4 नोकरावर प्रेम, नवऱ्याचा गेम! लग्न, हनीमून आणि हत्या, लग्नाच्या 13 दिवसातच सोनमने राजाचा जीवावर उठली https://tinyurl.com/yb8f2h3x
10. बंगळुरुत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे RCB वर 1 वर्षाची बंदी घालण्याच्या हालचाली, BCCI मोठा झटका देण्याच्या तयारीत https://tinyurl.com/49ed2p3x बंगळूर आयपीएल चेंगराचेंगरी; हताश बापानं लेकाच्या कबरीला मिठी मारली, म्हणाला, मला इथंच राहायचं आहे, जी जमीन लेकासाठी घेतली तिथं दफन करण्याची वेळ आली https://tinyurl.com/2t6u2xam
एबीपी माझा स्पेशल
चिनाब ब्रिजच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी 'बुलेटप्रूफ रेल्वे कोच' चा वापर; VVIP लोकांसाठी खाण्यापिण्याची सुद्धा स्पेशल अॅरेंजमेंट https://tinyurl.com/mumjh45d
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w























