एक्स्प्लोर
Advertisement
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2020 | शुक्रवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 एप्रिल 2020 | शुक्रवार
- पूल टेस्टिंग व प्लाज्मा थेरपीला केंद्राची मान्यता; आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/2VCXdkB प्लाझ्मा थेरपी सकारात्मक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा दावा https://bit.ly/3aAgGGP
- राज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर घटला, मृत्यूदर 7.21 टक्के टक्क्यांवरुन 4.40 टक्क्यांवर, राज्यभरातील कोरोना चाचण्यांपैकी जवळपास 94 टक्के निगेटिव्ह https://bit.ly/2VAeTNF
- पश्चिम महाराष्ट्रात 27 मोठे उद्योग सुरू, तर औरंगाबादमध्येही बजाजसह 50 कारखान्यात कामाला सुरुवात, दोन हजार पेक्षा अधिक कामगारांना रोजगार https://bit.ly/2zjPleP
- पंतप्रधान मोदींचा देशातील सरपंचांसोबत संवाद, गावांना स्वयंपूर्ण होण्याचा सल्ला, ग्रामपंचायतींसाठी ई-ग्राम स्वराज अॅप, स्वामित्व योजना लॉन्च https://bit.ly/3cHcaaP
- बुलेट ट्रेन प्रकल्पाला स्थगिती देण्याऐवजी महागाई भत्त्यात कपात करणं असंवेदनशील, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका https://bit.ly/2ztfFU3
- रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना तीन आठवडे अटकेपासून संरक्षण, काँग्रेस कार्यकर्त्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय, सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा गोस्वामी यांच्यावर आरोप https://bit.ly/3bM4Nit
- परराज्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशच्या मजुरांना परत आणणार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथयांचं आश्वासन
- घरी आलेला पाहुणा लपवल्यास गुन्हा दाखल, पंढरपूर प्रशासनाचा निर्णय तर आरोग्य विभागाचे काम नाकारणारे ब्लॅक लिस्टमध्ये, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://bit.ly/2Vz1Trt
- विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनंतरच विद्यापीठ आणि महाविद्यालयाच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती https://bit.ly/359n1rC
- कोकणच्या राजासाठी 'कोकणकन्या' धावली, विशेष पार्सल ट्रेनद्वारे आंब्याच्या 300 पेट्या दक्षिणेकडे रवाना, मुंबईत पोस्टाने आंबे येणार https://bit.ly/2KsB7L9
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
Advertisement