ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2021 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 नोव्हेंबर 2021 | सोमवार
1. अमरावती दंगलीचा कट भाजपच्या अनिल बोंडेंनी रचला; नवाब मलिक यांचा आरोप https://bit.ly/3ndOdQy आम्ही फोटो दाखवले तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, आशिष शेलार यांचा मलिकांवर पलटवार https://bit.ly/3HnQXmt
2. महाराष्ट्रातील माकडांना शेपट्या आपटत नाचायची गरज नव्हती; महाराष्ट्रातील हिंसाचारावर सामनातून टिकास्त्र https://bit.ly/3Cdf6rX राज्यातील हिंसाचाराप्रकरणी चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/3wOL8JP
3. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/3kChMcK 'असा अलौकिक शिवआराधक होणे नाही', बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून तीव्र शोक https://bit.ly/30nAvBM
4. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेची नवी समिती नेमण्याची मागणी, सरकारनं नेमलेल्या समितीवर विश्वास नसल्याचं संघटनेचं मत, निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची मागणी https://bit.ly/3Fj6kus मागण्या मान्य करण्यासाठी तुटेल एवढं ताणू नका, संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना शरद पवारांचं आवाहन https://bit.ly/3oonwbe
5. राज्य सरकार सध्या तरी पेट्रोल डिझेलवरील कर कमी करण्याच्या मानसिकतेत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं पंढरपुरात स्पष्टीकरण https://bit.ly/3HmvSJ2 भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती अमेरिका ठरवते, केंद्र सरकारला दोष देऊ नका; रावसाहेब दानवेंचा अजब दावा https://bit.ly/3nhvCDi
6. कार्तिकी एकादशीनिमित्त दुमदुमली पंढरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली, नांदेडमधील निळा गावचे टोणगे दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी https://bit.ly/30uDloQ
7. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव घटतोय; गेल्या 24 तासांत 10 हजार कोरोनाबाधितांची नोंद, 125 जणांचा मृत्यू, तर राज्यात रविवारी 956 नवीन रुग्णांचं निदान https://bit.ly/3Chx4tx
8. विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून डॉ. प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब तर भाजपकडून संजय किणेकर यांना उमेदवारी जाहीर, महाविकास आघाडीकडे बहुमत असल्यानं काँग्रेसचा विजय जवळपास निश्चित https://bit.ly/3HlGqYR
9. गुजरातच्या मोरबीमध्ये सहाशे कोटी रुपयांचं 120 किलो हेरॉईन जप्त, दोघांना अटक, गुजरात एटीएसची मोठी कारवाई
https://bit.ly/3FkTdc7
10. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरुन केंद्र आणि राज्याची एकत्रित बैठक, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यांतर प्रदूषणामुळे दिल्लीत लॉकडाऊन लावण्यासाठी हालचाली सुरु https://bit.ly/3ngFgpB दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे एक आठवडा शाळा बंद, कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम तर बांधकामंही थांबवण्याचा निर्णय https://bit.ly/3nfovLj
एबीपी माझा ब्लॉग
ऑसींची कमाल, किवी बेहाल- एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा लेख https://bit.ly/30p3vsA
एबीपी माझा विशेष
Majha Katta : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडला 'शिवचरित्रा'चा प्रवास (संग्रहित 'माझा कट्टा') https://bit.ly/3CcAqhv
Sanjay Raut vs Raj Thackeray : जेव्हा Raj Thackeray समर्थकांनी Sanjay Raut यांची गाडी फोडली https://bit.ly/3FhcA5V
हार्दिक पांड्याची 5 कोटी किमतींची 2 घड्याळं कस्टमच्या ताब्यात https://bit.ly/3CbYPne
बुटात बियर टाकून पिणे, ऑस्ट्रेलियाच्या किळसवाणं वाटणाऱ्या सेलिब्रेशनमागील खरी कहाणी https://bit.ly/3HpYOju
T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सर्वाधिक वेगवान अर्धशतक मिशेल मार्शच्या नावावर, जाणून घ्या टॉप 5 खेळाडू https://bit.ly/3qIlVjd
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv