एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 08 जून 2019 | शनिवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. मान्सून कोणत्याही क्षणी केरळात दाखल होणार, मान्सूनबाबतचे सर्व निकष पूर्ण झाल्याची स्कायमेटची माहिती, महाराष्ट्राच्या विविध भागातही वादळी वाऱ्यासह पाऊस
2. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा आज निकाल, सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद तर दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार
3. भाजपच्या राज्य कोअर कमिटीची मुंबईत खलबतं, मुख्यमंत्र्यांसह प्रकाश मेहतांचीही उपस्थिती, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता
4. राष्ट्रवादीऐवजी वंचित बहुजन आघाडीशी हातमिळवणी करण्याचे अशोक चव्हाणांचे संकेत, तर मुख्यमंत्री काँग्रेसचे आमदार फोडण्याच्या प्रयत्नात असल्याचाही आरोप
5. ममता बॅनर्जी आणि भाजपतल्या जयश्री रामाच्या वादाने पोस्ट खात्याच्या डोक्याला ताप, पोस्ट ऑफिसमध्ये येणाऱ्या एकूण पत्रांपैकी 10 टक्के पत्र फक्त दीदींनाच
6. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मालदीवच्या दौऱ्यावर, शपथविधीनंतर पहिलाच परदेश दौरा, मालदीवच्या संसदेलाही संबोधित करणार
7. मंत्रालयातील कामचुकार कर्मचाऱ्यांना सरकारचा दणका, दुपारी अर्ध्या तासात जेवण उरकण्याचे आदेश, नागरिकांच्या सोयीसाठी सरकारचा जीआर
8. बीएमसी आयुक्तांच्या इमारतीला डेंग्यू, मलेरियाच्या डासांचा विळखा, दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू वसाहतीत प्रादुर्भाव, पावसाळ्याच्या तोंडावर आरोग्य विभागासमोर आव्हान
9. पुढच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीला बलिदान बॅज असलेले ग्लोव्ज बदलावे लागणार, बीसीसीआयची विनंती आयसीसीने फेटाळली
10. अमेरिकेतल्या चॅरिटी म्युझिक शोमध्ये अमृता फडणवीस यांचा ग्लॅमरस लूक, मिसेस सीएमनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement



















