एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन | 07 जून 2020 | रविवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
- मुंबई पूर्व उपनगरात गॅस गळतीमुळं दुर्गंधी, महापालिकेकडे अनेक तक्रारी, नागरिकांमध्ये भीती; आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचं ट्विट
- राज्यात काल दिवसभरात 2739 नव्या कोरोना बाधितांची नोंद, राज्यातील एकूण रुग्णसंख्या 82,968वर; आतापर्यंत 37 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज
- वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा 15 जुलैपासून होणार; विद्यार्थ्यांना गावाजवळच्या महाविद्यालयात परीक्षा देण्याची मुभा; संकेतस्थळावर वेळापत्रक जारी
- यंदाची आषाडी वारी वारकऱ्यांविना; शहरातील 450 मठ आणि धर्मशाळांचे तपासणी सुरु, वारकऱ्याना शहरात प्रवेश न देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
- उद्यापासून एसटीच्या अतिरिक्त 250 बसेस धावणार; खासगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना देखील ओळखपत्र दाखवून प्रवास करण्याची मुभा
- मुंबईत येत्या आठ तारखेपासून बेस्ट बस सेवा पूर्ववत होणार, अत्यावश्यक सेवांसोबतच इतर नागरिकांसाठीही सेवा उपलब्ध; राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्णय
- लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे माथेरानवासियांचे हाल, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा
- सम-विषम पद्धतीचा नियम असतानाही नाशिकात दुकानं सुरु; अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी तर नाशिकरांकडून सोशल डिस्टन्सिंगला हरताळ
- नागपूर जिल्ह्यात दिव्यांग अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात
- सीमा प्रश्नावर काल भारत आणि चीनमध्ये तब्बल साडे पाच तास बैठक; बैठकीतील चर्चा अजूनही गुलदस्त्यात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement