भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या रॅलीसाठी स्वतः उद्धव ठाकरे आज गुजरातमध्ये, अफजल खानाच्या मदतीला उंदरांची कुमक म्हणत काँग्रेसची बोचरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणूक आयोगाकडून दिलासा, 'मिशन शक्ती'च्या विषयी दिलेलं भाषण आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचा निर्वाळा पुण्यातून काँग्रेसकडून पुन्हा प्रवीण गायकवाडांचं नाव चर्चेत, आज काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश, सांगलींच्याही जागेचा तिढा आज सुटण्याची चिन्हं महाराष्ट्रात काँग्रेसच्या तिकीट वाटपातील घोळाची हायकमांडकडून दखल, डॅमेज कंट्रोलसाठी 3 नेत्यांचं शिष्टमंडळ मुंबईत सांगलीत वंचित आघाडीकडून प्रकाश शेंडगेंची उमेदवारी जवळपास फायनल झाल्याची चर्चा, बदलत्या समीकरणांमुळे उमेदवारही बदलणार मुंबईत पूनम महाजनांच्या बॅनरवरुन आदित्य ठाकरेंचा फोटो गायब, पूनम महाजनांनी माफी मागेपर्यंत प्रचारात सहभागी न होण्याचा युवासेनेचा निर्णय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं लावारिस, भाजप प्रवक्ते अवधुत वाघांची ट्विटरवर मुक्ताफळं, विरोधकांची टीका तर शेतकऱ्यांचाही तीव्र संताप लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दक्षिण मुंबईतून तब्बल 135 किलो सोनं जप्त, डीआरआयच्या पथकाची कारवाई, आरोपींकडून 200 किलो सोन्याच्या तस्करीची कबुली लंडन कोर्टाचा नीरव मोदीला सलग दुसऱ्यांदा दणका, साक्षीदारांच्या जीवाला धोका असल्यानं जामीन फेटाळला, 26 एप्रिलपर्यंत कोठडी कायम सनरायझर्स हैदराबादनं उडवला राजस्थान रॉयल्सचा पाच विकेट्सनी धुव्वा, पाच गडी व सहा चेंडू राखून राजस्थान रॉयल्सवर मात