एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 30 मे 2019 | गुरुवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
![स्मार्ट बुलेटिन | 30 मे 2019 | गुरुवार | एबीपी माझा ABP Majha smart bulletin for 30th 2019 latest updates स्मार्ट बुलेटिन | 30 मे 2019 | गुरुवार | एबीपी माझा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/30091149/smart-bulletin.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
1. शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींकडून महात्मा गांधीजींना नमन, अटल बिहारी वाजपेयींना आदरांजली तर शहीद जवानांच्या स्मारकालाही वंदन
2. नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा संध्याकाळी 7 वाजता महासोहळा, विरोधकांसह बिमस्टेकचे प्रमुख उपस्थित राहणार, दिल्लीत कडेकोट बंदोबस्त
3. अरुण जेटली यांच्या निवृत्तीमुळे अर्थमंत्रीपदी पियुष गोयलांना संधी मिळण्याची शक्यता, नरेंद्र मोदींच्या इतर मंत्रिमंडळाची सर्वांनाच उत्सुकता
4. शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांना मंत्रिपदाची संधी, कुटुंबियांसह उद्धव ठाकरे दिल्लीत तर अधिवेशनानंतर अन्य मंत्री शपथ घेणार
5. प्रकल्पाच्या मान्यतेसाठी केंद्रीय मंत्र्याकडून बॉलिवूडच्या दोन नायिकांची मागणी, सुब्रह्मण्यम स्वामींच्या ट्वीटने खळबळ, मंत्र्याची नावं मात्र गुलदस्त्यात
6. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडीत मोठी अस्वस्थता, अनेक बडे नेते भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा, काँग्रेस नेत्यांकडून मात्र इन्कार
7. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बँकर्सची झाडाझडती, शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचं उद्दीष्ट न गाठल्याने बँकांना कारवाईचा इशारा
8. डॉ. पायल तडवींच्या आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपींना 31 मे पर्यंत पोलिस कोठडी, तर कौटुंबिक तणावातून आत्महत्या केल्याचा आरोपींच्या वकिलांचा दावा
9. इंग्लंडमध्ये आजपासून क्रिकेट विश्वचषकाची रणधुमाळी, यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये सलामीचा सामना रंगणार
10. नरेंद्र मोदींचा बायोपिक बॉक्स ऑफिसवर आपटला, 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाची पाच दिवसात केवळ 16 कोटी रुपयांची कमाई
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)