एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 24जून 2019 | सोमवार | एबीपी माझा
राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
स्मार्ट बुलेटिन | 24जून 2019 | सोमवार | एबीपी माझा
- मुख्यमंत्र्यांचं सरकारी निवासस्थान डिफॉल्टरच्या यादीत, मुंबई महापालिकेचं पाण्याचं बिल थकवल्याचा माहिती अधिकार कार्यकर्त्याचा दावा
- विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेची संयुक्त बैठक, आमदारांमध्ये समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती
- विधानपरिषदेच्या उपसभापतींची नियुक्ती लवकरच, बिनविरोध नियुक्ती होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे डावपेच
- राज्यघटनेनुसार राधाकृष्ण विखे आणि जयदत्त क्षीरसागर मंत्री होऊ शकत नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य
- काळ्या पैशांबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहात महत्वपूर्ण अहवाल सादर होणार, देशविदेशातल्या काळ्या पैशाबाबत विस्तृत माहिती मिळण्याची शक्यता
- उत्तरप्रदेशातील रामपूरमध्ये सहा वर्षाच्या चिमुरडीची बलात्कार करुन हत्या, एसपी अजय पाल शर्मांनी आरोपीला घातल्या गोळ्या, सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव
- कोल्हापूर, सोलापूर, अकोल्यात रात्रीपासून जोरदार पाऊस, कोकणातही मुसळधारेचा अंदाज, मुंबईतही आजच मान्सून दाखल होण्याची शक्यता
- राजस्थानमधील बाडमेरच्या जसोलमध्ये धार्मिक कार्यक्रमात मंडप कोसळला, दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू, 45 जण जखमी
- पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 49 धावांनी विजय, आफ्रिकेचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात, आज अफगाणिस्तान आणि बांगलादेशमध्ये लढत
- तुकोबांच्या पालखीचा आज प्रस्थान सोहळा, विठ्ठलाच्या भक्तीनं देहूत वारकरी दंग, माझावर विशेष कव्हरेज
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement