Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 जून 2021 सोमवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. कोरोना संकटात योग आशेचा किरण, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोदींचा जनतेशी संवाद, हरिद्वारमध्ये रामदेव बाबा यांची जागृती, तर न्यूयॉर्कमध्येही योग दिनाचा उत्साह
2. निर्जला एकादशीनिमित्त पंढरी रंगीबेरंगी फुलांनी सजली, विठ्ठल मंदिराचा गाभारा आणि चौखांबीला आकर्षक सजावट
3. मुंबईत आजपासून 18 ते 29 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण नाही, गर्दी टाळण्यासाठी महापालिकेचा निर्णय, तर 30 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण सुरु राहणार
4. भाजपशी जुळवून घ्या, ईडीच्या रडारवर असलेल्या प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्तेय फोडत असल्याचा आरोप
5. सरनाईकांचं पत्र हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया, सरनाईकांच्या मतदार संघात राष्ट्रवादी आणि सेनेत वाद असेल तर तो मिटवू जयंत पाटलांचं वक्तव्य
पाहा व्हिडीओ :
6. मुख्यमंत्र्यांनंतर आता राष्ट्रवादीनंही काँग्रेसला फटकारलं, शेवटपर्यंत स्वबळाचा आग्रह धरला तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येईल, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य
7. कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्यानं कल्याण-डोंबिवलीत निर्बंध शिथील, अकोला जिल्हाही आजपासून अनलॉक, जनतेला मोठा दिलासा
8. नवी मुंबई विमानतळाचा मुद्दा चिघळणार, दी. बा. पाटलांचं नाव देण्याच्या मागणीला जोर, प्रकल्पग्रस्तांचा 24 जूनला मशाल मार्च
9. मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका, मागासवर्गीय आयोगाचा पुनर्विचार करण्याची मागणी, तर सोलापुरात 4 जुलैला मोर्चाची हाक
10. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात, तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलँडच्या 2 विकेट्सवर 101 धावा