एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 21 जुलै 2020 | मंगळवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. दूध दरासाठी सांगलीत स्वाभिमानीचं आज लाक्षणिक आंदोलन, सांगलीत गोकूळचा टँकर फोडला, तर कोल्हापुरातील नांदणीत भैरवनाथाला अभिषेक 2. कोरोनावरील ऑक्सफर्डच्या लसीचा मानवी शरीरावर सकारात्मक परिणाम, डोस दिल्यानं रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ, लस सुरक्षित असल्याचा ऑक्सफर्डचा दावा 3. महाराष्ट्रात काल दिवसभरात 8 हजार 240 कोरोना रुग्ण, तर 176 रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात 5 हजार 460 रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात 4. मुंबईमध्ये काल दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 35 नवे रुग्ण, तर 41 जणांचा मृत्यू; कल्याण-डोंबिवलीमध्ये 427 कोरोनाग्रस्त वाढले 5. पुण्यात कोरोनाचा वाढता कहर, सलग दुसऱ्या दिवशी अडीच हजारांनी रुग्णसंख्येत वाढ, 24 तासांत 44 रुग्णांचा मृत्यू पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 जुलै 2020 | मंगळवार | ABP Majha 6. भिवंडीतील लॉकडाऊनमध्ये शिथीलता, 31 जुलैपर्यंत हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन, तर पनवेलमध्ये कन्टेन्मेट झोन वगळता 22 जुलैपासून अनलॉक 7. मुस्लिम कोविड योद्ध्यांकडून धर्मभेदाची राखरांगोळी, बडा कब्रस्थानकडून 300 हिंदूंवर अंत्यसंस्कार; कोरोनामुळे रक्ताच्या नातलगांकडून पाठ 8. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना एसटीने प्रवासाची मुभा, तर कोकणातील ग्रामस्थांकडून चौदा दिवसांचं क्वॉरंटाईन सक्तीचं 9. कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप यावर्षी होणार नाही, आयपीएलचा मार्ग मोकळा; बीसीसीआयकडून सप्टेंबर महिन्याच्या शेवटी आयपीएलच्या आयोजनाची शक्यता 10. नागपूर शहरात धक्कादायक घटना, दोन अप्लवयीन मुलांनी गळफास घेत जीवन संपवलं; आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्टअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement