एक्स्प्लोर
Advertisement
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 1 फेब्रुवारी 2020 | शनिवार | ABP Majha
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. अर्थमंत्री सितारमण आज अर्थसंकल्प सादर करणार, मंदी, बेरोजगारी, महागाईतल्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचं आव्हान, अर्थसंकल्पाचे सर्व अपडेट्स दिवसभर पाहा एबीपी माझावर
2. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत आजपासून वाढ, एलआयसीच्या 23 पॉलिसी बंद तर जुन्या अँड्रॉईड आणि आयओएसवर व्हॉट्सअॅप चालणार नाही
3. कोरेगाव-भीमाची चौकशी करणारं आयोग कामकाज गुंडाळण्याच्या मनस्थितीत, सरकार पुरेशी सुविधा पुरवत नसल्याची तक्रार
4. जालना विनयभंग प्रकरणी मुख्य आरोपी आतिश खंदारेसह 5 जणांना अटक, माझाच्या बातमीनंतर तपास यंत्रणा कामाला, व्हायरल व्हीडिओवरुन राज्यभरात संताप
5. निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीला पटियाला हाऊस कोर्टाची स्थगिती, आजची फाशी टळली
6. बलात्कारात मुख्य आरोपीला मदत करणारा सहआरोपीही तितक्याच कठोर शिक्षेस पात्र, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल
7. बेस्ट वीजदरवाढीला मनसेचा विरोध; आयोगाला पत्र, विद्युत विभाग परिवहन विभागाला पोसत असल्याचा ठपका, मुंबई मनपाकडून आरोपांचं खंडन
8. भिवंडीत बंदुकीचा धाक दाखवत 1 कोटी 86 लाख लुटले, कुटुंबातल्या चौघांचे हात-पाय बांधून चोरट्यांनी लुबाडलं, चोरट्यांचा शोध सुरु
9. चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे 259 जणांचा मृत्यू, एअर इंडियाचे विशेष विमान 324 भारतीयांसह चीनहून दिल्लीला पोहोचले
10. यूरोपीयन यूनियनमधून अखेर ब्रिटन बाहेर, नागरिकांचा जल्लोष, सरकारी इमारती झळाळल्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रिकेट
राजकारण
राजकारण
Advertisement