स्मार्ट बुलेटिन | 17 फेब्रुवारी 2021 | बुधवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

1. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यानं नियमांची कडक अंमलबजावणी होणार, मुख्यमंत्र्यांची माहिती, गर्दी झाल्यास कारवाई होणार
2. संजय राठोड माध्यमांसमोर येण्यावरुन संभ्रम, उद्या पोहरादेवी येथून पहिल्यांदा माध्यमांशी बोलणार, महंत सुनील महाराजांची माहिती तर हे वृत्त अधिकृत नसल्याचं जितेंद्र महाराजांचं वक्तव्य
3. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना अॅसिड हल्ल्याची धमकी, शिवसेनेच्या लेटरपॅडवरुन धमकी आल्याचा दावा, दिल्लीत तक्रार दाखल
4. बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान, बोर्डाकडून संभाव्य वेळापत्रक जाहीर तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत
5. साताऱ्यातल्या वाईमधील बंगल्यात अत्याधुनिक पद्धतीने गांजाची शेती, दोन परदेशी नागरिकांना अटक, तळमजल्यापासून टेरेसपर्यंत गांजाची लागवड
6. टूलकीट प्रकरणात शंतनू मुळूकला अटकपूर्व जामीन, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय, निकीता जेकबबाबतचा निर्णय हायकोर्टानं राखून ठेवला
7. पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरुन किरण बेदींची उचलबांगडी, काँग्रेस सरकार अल्पमतात
8. टॉप सिक्युरिटी प्रकरणी MMRDA चे आयुक्त आर. ए .राजीव. यांची ईडीकडून सात तास चौकशी
9. पेट्रोल डिझेलच्या दरात सलग नवव्या दिवशी वाढ, राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली
10. दक्षिण आफ्रिकेने सीरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीचे 10 लाख डोस परत घेण्यास सांगितलं























