एक्स्प्लोर
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 जून 2021 | रविवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 13 जून 2021 | रविवार | ABP Majha
- मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत ऑरेंज अलर्ट; प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
- सलगच्या पावसामुळे नवी मुंबईतील धबधबे प्रवाहीत, कोरोनाचं संकट विसरुन पारसिक हिल परिसरात नागरिकांची गर्दी
- नालेसफाई कंत्राटदाराला अमानूष वागणूक देणारे शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे वादाच्या भोवऱ्यात ; कामचुकारपणाचा आरोप लावत कंत्राटदाराला नाल्याच्या कचऱ्यात बसवलं
- ब्लॅक फंगससह कोरोनासंबंधित औषधं, मेडिकल वस्तूंवर जीएसटी कपात; जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत महत्वाचे निर्णय
- जी-7 शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा 'वन अर्थ वन हेल्थ'चा नारा, तर जर्मनीच्या चांसलर एंजेला मर्केल यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक
- सीरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला, डब्ल्यूएचओसह अनेकांवर लखनौ कोर्टात फसवणुकीची तक्रार, कोविशील्डच्या डोसनंतर अँटीबॉडीज तयार न झाल्याचा तक्रारदाराचा आरोप
- राज्यात काल दिवसभरात 10 हजार 697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 14 हजार 910 डिस्चार्ज
- माझी कुणासोबत तुलना करू नका, माझा लढा स्वतंत्र; खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं वक्तव्य
- देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सत्तेत असूनही गुलामासारखी वागणूक मिळाली, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं धक्कादायक वक्तव्य
- फ्रेंच ओपनच्या सेमीफायनलमध्ये जोकोविचने नदालला पराभूत करून रचला इतिहास; अंतिम सामन्यात त्सिटिपासशी होणार सामना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
बीड
Advertisement