एक्स्प्लोर
Advertisement
स्मार्ट बुलेटिन | 13 फेब्रुवारी 2020 | गुरुवार | एबीपी माझा
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. घरात पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य खबरदारी न घेतल्याने पुण्यात दाम्पत्याचा मृत्यू, बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीमधील घटना
2. ठाणेकरांचं पाणी 40 टक्क्यांनी महागण्याची शक्यता, टीएमटीचं भाडंही वाढण्याचे संकेत, महापालिकेच्या अर्थसंकल्पात ठाणेकरांवर बोजा
3. गाडीची नंबरप्लेट मराठी भाषेत असल्यास कारवाई करणार नाही, उद्योग आणि मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांची माहिती, तर बॉम्बे हायकोर्टाचं नाव मुंबई हायकोर्ट करण्याचेही ठाकरे सरकारचे प्रयत्न
4. येत्या 29 फेब्रुवारीपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा, अत्यावश्यक सेवांना वगळलं, निर्णयावर बच्चू कडूंची सडकून टीका
5. सरकारी तिजोरीत खटखटाड असताना मंत्र्यांच्या बंगल्यांवर तब्बल 15 कोटींचा खर्च, निविदा मंजूर न करताच नुतनीकरण सुरु केल्याचा आरोप
6. मुंबई महापालिकेच्या फेरीवाला धोरणाला मनसेचा विरोध, आज राजगड ते जी वॉर्डवर मोर्चा, तर आजपासून राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर
7. तूर विक्री नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ, राज्यातील शेतकऱ्यांना 15 मार्चपर्यंत हमीभावाने तूर विक्री नोंदणी करता येणार
8. अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर राज्य सरकारचा निर्णय
9. कोस्टल रोडचं काम इकोफ्रेण्डली विटांनी होणार, पर्यावरणप्रेमी, कोळी बांधवांच्या विरोधावर महापालिकेचा उतारा, इस्रायलच्या कंपनीला कंत्राट
10. बिस्किटचा पुडा आणि भुईमुगाच्या शेंगांमधून 45 लाखांच्या परदेशी चलनाची तस्करी, दिल्ली विमानतळावर तस्कराचा पर्दाफाश, तपास यंत्रणा अवाक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
क्राईम
भारत
राजकारण
Advertisement