स्मार्ट बुलेटिन | 13 मार्च 2021 | शनिवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.

स्मार्ट बुलेटिन | 13 मार्च 2021 | शनिवार | एबीपी माझा
राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ, मुंबईतही सहा महिन्यातील सर्वात मोठी वाढ
राज्यातील काही शहरांमध्ये विकेंड लॉकडाऊन, तर अनेक ठिकाणी शाळा बंद करण्याचा निर्णय
एपीआय सचिन वाझेंकडून सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल, 19 मार्च रोजी सुनावणी
मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट 2021 परीक्षा 1 ऑगस्ट रोजी, नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून तारीख जाहीर
मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई समन्वयाने, एकजुटीने लढू आणि जिंकू, मुख्यमंत्री ठाकरेंचं वक्तव्य
आयसीआयसीआय बँक बेहिशेबी कर्जवाटप गैरव्यवहार प्रकरणात व्हिडीओकॉनचे वेणुगोपाल धूत यांना सशर्त जामीन मंजूर
रेल्वे चतुर्थ श्रेणी नोकरभरती प्रकरणी हायकोर्टाची तीव्र नाराजी, रेल्वे प्रशासनाची चांगलीच कानउघाडणी
नंदा खरे यांच्या 'उद्या' ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर, मात्र खरेंनी पुरस्कार नाकारला
पहिल्या टी 20 मध्ये इंग्लंडकडून टीम इंडियाचा पराभव; 8 गडी राखत भारतावर मात
यंदा ऑस्करची नामांकने प्रियांका चोप्रा आणि निक जोनास जाहीर करणार, 15 मार्चला नामांकने जाहीर होणार























