(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 06 डिसेंबर 2021 : सोमवार : ABP Majha
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
१. ओमायक्रॉनचे पिंपरीत 6 तर पुण्यात 1 रुग्ण रुग्ण आढळल्यानं प्रशासनाची चिंता वाढली, राज्यात ओमायक्रॉनचे 8 तर देशभरात 21 रुग्ण, अनेक संशयिताचे अहवाल प्रतीक्षेत
२. राज्यातील ओमायक्रॉनबाधित रुग्णांची प्रकृती ठीक, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
३. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज महाराष्ट्र दौऱ्यावर, शिवप्रेमींच्या विरोधानंतर हेलिकॉप्टरऐवजी रोपवेनं किल्ले रायगड गाठणार, महाड चवदार तळ्यालाही भेट देणार
President Ramnath Kovind Raigad Visit : राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind) आज एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर (Raigad Fort) आहेत. राष्ट्रपती हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. मात्र याला शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. खासदार संभाजी छत्रपती ( Sambhaji Chhatrapati) यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं.
४. भारतरत्न डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर रांगा, मुंबई लोकलकडून विशेष सेवा
Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din News Updates : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसेच कोरोना बाबतचे नियम पाळले जावेत म्हणून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कोव्हिडचे संकट असल्याने प्रशासनाने गर्दी न कोव्हिड बाबत सुरक्षेचे उपाय योजना करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील शेकडो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.
५. औरंगाबादेत भावाकडून बहिणीची निर्घृण हत्या, प्रेमविवाह केल्याच्या रागातून कृत्य, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
६. नाशिकमधील संमेलनाचं सूप वाजलं, 95 व्या साहित्य संमेलनाचा मान लातुरला, उदगीरमध्ये होणार पुढचं साहित्य संमेलन
७. आंदोलनादरम्यान झालेल्या 700 शेतकऱ्यांच्या मृत्यूला राकेश टिकैत जबाबदार, भाजप नेत्याचे आरोप
८. रशियाचे राष्ट्रपती पुतिन आज भारत दौऱ्यावर, दिल्लीमध्ये पंतप्रधानांसोबत बैठक, चीन-अफगानिस्तान मुद्द्यावर होऊ शकते चर्चा
९. दुबईला निघालेली अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ईडीनं विमानतळावर अडवलं, सुकेश चंद्रशेखर प्रकरणामुळं जॅकलिनच्या अडचणीत वाढ
१०. वानखेडे कसोटीत टीम इंडिया विजयापासून पाच विकेट्स दूर, 540 धावांचा पाठलाग करताना 140 धावांत किवींचे 5 गडी तंबूत