Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 31 मे 2021 | सोमवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 31 मे 2021 | सोमवार | ABP Majha
1. राज्यात कडक लॉकडाऊन नाही मात्र निर्बंध कायम राहणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, ब्रेक द चेनचे आदेश 15 जूनपर्यंत लागू, आवश्यक सेवांची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरु राहणार
2. 20 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्हिटी रेट असलेल्या जिल्हांची सीमाबंदी कायम, तर दहा टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांसाठी काहीसा दिलासा
3. कोरोनामुक्त गावाचा संकल्प करुया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आवाहन; तर गावातून कोरोना हद्दपार करणाऱ्या पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे यांच सरपंचांचं कौतुक
4. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेआधी लहान मुलं एमआयएस-सी आजाराच्या विळख्यात, एकट्या जळगावात 15 रुग्ण, 5 ते 10 वयोगटातील बालकांमध्ये लक्षणं
5. परराज्यातील प्रवासी RT-PCR टेस्ट न करताच थेट घरी, ठाणे स्थानकातील धक्कादायक प्रकार, रिक्षाचालक आणि पालिका कर्मचारी जबाबदार असल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत समोर
6. मुंबईला अधिक वेगवान करणाऱ्या मेट्रो 7 आणि मेट्रो 2A च्या चाचणीला आजपासून सुरुवात, मुख्यमंत्री हिरवा कंदील दाखवणार, ऑगस्टपर्यंत सेवा सुरु करण्याचं लक्ष्य
7. 1 जूनऐवजी 30 मे रोजीच मान्सूनचं केरळात आगमन, स्कायमेट वेदरचं वृत्त, तर मनमाड, अकोला आणि कोकणात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
8. घटनेच्या कलम 370 नुसार काश्मीरला विशेष दर्जा मिळाला तरच भारताशी चर्चा करु, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची नवी अट
9. वडील हरिवंश राय बच्चन यांच्या कविता सापडत नसल्याने अमिताभ बच्चन स्वत:वरच चिडले, घराच्या नुतनीकरणाच्या वेळी साहित्यिक ठेवा गहाळ, ब्लॉगद्वारे भावना व्यक्त
10. एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात मेरी कोमचा पराभव, कझाकस्तानच्या नाझीम किझीबेनेची बाजी, मेरी कोमला रौप्यपदक