Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 31 मार्च 2021| बुधवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 31 मार्च 2021| बुधवार | ABP Majha
1. शरद पवारांवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया, पित्तनलिकेच्या मुखाशी असलेला खडा काढण्यात डॉक्टरांना यश, पवारांची प्रकृती स्थिर
2. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे रुग्णालयात, कोविडची लागण झाल्यानंतर खोकल्याचा त्रास बळावल्यानं उपचार सुरु
3. राज्यात काल 27,918 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
4. वाढत्या दबावानंतर औरंगाबादमधला लॉकडाऊन रद्द, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची माहिती, खासदार इम्तियाज जलिलांचा कार्यकर्त्यांसह जल्लोष
5. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर अॅक्शन प्लॅन तयार करा, नीती आयोगाच्या राज्यांना सूचना, तर लॉकडाऊन लावायचा झाल्यास आधी भरपाई द्या, पृथ्वीराज चव्हाणांचा सल्ला
6. गृहमंत्री देशमुखांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणाऱ्या परमबीर यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी, तर चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या समितीची घोषणा
7. अंमली पदार्थ प्रकरणात अभिनेता एजाज खान एनसीबीच्या ताब्यात, ड्रग्ज पेडलर शाहरुख खान आणि शादाब बटाटाच्या चौकशीनंतर एजाजवर कारवाई
8. रेल्वेत प्रवाशांना रात्री मोबाईल, लॅपटॉप चार्ज करता येणार नाही, रेल्वेत आगीच्या घटना वाढल्यानं भारतीय रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
9. एसटीच्या स्मार्ट कार्ड योजनेला 30 सष्टेंबरपर्यंत मुदतवाढ, परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती
10. ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर, 'सनातन' या कांदबरीसाठी पुरस्कार