Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 जुलै 2021 | सोमवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज साताऱ्यातील दरडग्रस्तांची भेट घेणार, उपमुख्यमंत्री अजित पवार सातारा, सांगली, कोल्हापूर दौऱ्यावर, पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार
2. ग्रामस्थांच्या मागणीनंतर महाडच्या तळीये आणि साताऱ्याच्या आंबेघरमधील शोधकार्य थांबवलं, तळीयेत आज शोकसभेचं आयोजन
3. चिपळूणकरांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, कर्जमाफी करण्याची मागणी, तर कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही
4. इतिहासात पहिल्यांदाच कोयना धरणाचं पाणी लालभडक, डोंगर उतारावरुन माती वाहून आल्याचा तज्ज्ञांचा अंदाज
5. हिमाचल प्रदेशाच्या किन्नौरमध्ये मोठी दुर्घटना, पर्यटकांच्या टेम्पोवर दरड कोसळून 9 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये नागपुरातील तरुणीचाही समावेश
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 जुलै 2021 | सोमवार | ABP Majha
6. कारगिल युद्धातील विजयाला 22 वर्ष पूर्ण, द्रासमध्ये राष्ट्रपती शहिदांना श्रद्धांजली अर्पण करणार, विजय दिनानिमित्त एबीपी माझावर विशेष कार्यक्रम
7. तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झालेली अकरावी सीईटीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ववत, दुपारी 3 वाजल्यापासून अर्ज करता येणार, 2 ऑगस्ट अंतिम तारिख
8. जळगावच्या उपमहापौरांवर गोळीबार, हल्लेखोराचा निशाणा चुकल्यानं कुलभूषण पाटील थोडक्यात बचावले, क्रिकेटवरुन सुरु झालेला वाद विकोपाला
9. टी20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताची श्रीलंकेवर मात, सूर्याची बॅट तळपली, तर भूवनेश्वरच्या खात्यात चार विकेट्स
10. आयपीएलचा खंडीत झालेला डाव 19 सप्टेंबरपासून युएईत, अंतिम सामना 15 ऑक्टोबरला, उर्वरित 31 सामन्यांचं दुबई, आबूदाबीत आयोजन