Smart Bulletin : एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन : 24 सप्टेंबर 2021 : शुक्रवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीन (Smart Bulletin) मध्ये...
1. ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी, सरकार सहा जिल्ह्यांतील पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करणार, तर नव्या प्रभाग पद्धतीला काँग्रेसचा विरोध
2. जातीनिहाय जनगणनेस केंद्राचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रातून भूमिका स्पष्ट, जातीच्या नावातील घोळावरती बोट
3. एबीपी माझानं खड्ड्यात गेलेला महाराष्ट्र दाखवल्यानंतर यंत्रणांना जाग, आज एकनाथ शिंदे ठाणे ते पडघा या रस्त्याची पाहणी करणार, खड्डे टाळण्यासाठी भुजबळ रेल्वे प्रवास करणार
4. राज्याच्या आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या हॉल तिकीटावर उत्तर प्रदेशचा पत्ता, सर्व्हर अपग्रेडेशन प्रक्रियेमुळं घोळ झाल्याचं आरोग्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण
5. उरीमध्ये दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश, मोठा शस्त्रसाठा जप्त
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin : एबीपी माझा स्मार्ट बुलेटिन : 24 सप्टेंबर 2021 : शुक्रवार : ABP Majha
6. अतिक्रमणविरोधी कारवाई करताना पोलिसांवर जमावाचा गोळीबार, दोघांचा मृत्यू, 9 पोलीस जखमी, राहुल गांधींची भाजपवर टीका
7. पाकिस्तान दहशतवाद्यांचं माहेरघर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीदरम्यान अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडून चिंता व्यक्त
8. अॅमेझॉनकडून देशात मेगाभरती, भारतात 1 लाख 10 हजार नोकऱ्या देणार, 2025 पर्यंत 10 लाख नोकऱ्या देण्याचाही मानस
9. रस्त्याच्या मधोमध असलेल्या चेंबरमध्ये दुचाकी अडकली, उल्हासनगरमधील घटना, अपघातात दुचाकीस्वार थोडक्यात बचावला
10. आयपीएलमध्ये कोलकाताचा मुंबईवर 7 गडी राखून विजय, व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठीची अर्धशतकं, आज बंगळुरु विरुद्ध चेन्नई सामना रंगणार