एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 23 जुलै 2019 | मंगळवार | एबीपी माझा
#Latest News #Marathi News #Smart Bulletin राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
1. मराठमोळे लेफ्टनंट जनरल एम एम नरवणे नवे लष्कर उपप्रमुख, लष्करप्रमुखपदासाठीही नरवणे यांचं नाव आघाडीवर
2. काश्मीरप्रश्नी पंतप्रधान मोदींनी मदत मागितल्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा खोटा दावा, काश्मीर मुद्द्यावर फक्त द्वीपक्षीय चर्चाच, भारतीय परराष्ट्र खात्याचं स्पष्टीकरण
3. भिवंडीत केमिकल कंपनीच्या गोदामाला आग, ज्वलनशील पदार्थ असल्याने स्फोट, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
4. कर्नाटकच्या नाटकावर आज पडदा पडण्याची शक्यता, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बहुतम सिद्ध करण्याची विधानसभाध्यक्षांकडून मुदत
5. लिंगायत समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्यासाठी हालचाली, आठ दिवसात अहवाल तयार करण्याचे मागासवर्ग आयोगाला आदेश, विधानसभेच्या तोंडावर मोठा निर्णय
6. सोलापुरात कृत्रिम पावसाच्या ढगाची पाहणी आजपासून तर राज्यातील अनेक भागात दुष्काळाची झळ, नागपुरातील पाणी कपात एका महिन्यासाठी वाढवली
7. यशस्वी प्रक्षेपणानंतर चांद्रयान-2 पृथ्वीच्या कक्षेत, 6 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार, इस्रोच्या कामगिरीचं जगभरातून कौतुक
8. मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमधील मासेविक्रेत्यांचं ऐरोलीत स्थलांतर नाही, महापालिका आयुक्तांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आश्वासन
9. बेस्टचे कर्मचारी 6 ऑगस्टपासून पुन्हा संपावर जाणार, वेतन करारासंबंधीच्या वाटाघाटी रखडल्याने संपाचं हत्यार
10. मुंबईतील ओशिवरा परिसरात सोमवारी रात्री हत्येचा थरार, 33 वर्षीय तरुणाचा घरात घुसून गोळ्या झाडून खून, आरोपीचा शोध सुरु
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement