Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 मार्च 2021 | रविवार | ABP Majha
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 21 मार्च 2021 | रविवार | ABP Majha
१.आयपीएस परमबीर यांच्या आरोपामुळं गृहमंत्री अनिल देशमुखांची खुर्ची धोक्यात, देशमुखांनी वाझेंना १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप
२. गृहमंत्र्यांकडून वाढणाऱ्या दबावाची मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार आणि अजितदादांना कल्पना दिली होती – परमबीर सिंह
३. परमबीर सिंह यांनी आरोप सिद्ध करावेत, मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार : गृहमंत्री
४. अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घ्या,फडणवीसांबरोबरच राज ठाकरेंचीही मागणी
५. जर परमबीर यांच्या आरोपात तथ्य असतील तर शरद पवारांना जाब विचारला पाहिजे – संजय निरुपम
६. कोरोना रुग्णसंख्येचे दररोज नवीन रेकॉर्ड, काल दिवसभरात २७ हजार १२६ रुग्णांची भर
७. आजपासून मुंबईत दररोज ५० हजार मुंबईकरांची कोरोना चाचणी करण्याचं महापालिकेचं लक्ष्य, सार्वजनिक ठिकाणी होणार चाचण्या
८. दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच, लेखी परीक्षांसाठी अर्धा तास अधिक - शिक्षणमंत्री
९. देशात चार कोटी लोकांना कोरोनाची लस, लसीकरणाच्या कार्यक्रमाने घेतला वेग
१०. टीम इंडियानं पाचव्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यासह मालिकाही जिंकली; अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा धुव्वा