एक्स्प्लोर

Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 20 डिसेंबर 2021 : सोमवार : ABP Majha

देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. 48 दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर हायकोर्टात महत्त्वाची सुनावणी, त्रिसदस्यीय समितीच्या अहवालाकडे लक्ष, सुनावणीपूर्वी नेते आणि आंदोलकांमध्ये खलबतं

2.  हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा, अमित शाहांचं मुख्यमंत्री ठाकरेंना खुलं आव्हान, मुख्यमंत्रिपदासाठी हिंदुत्व सोडल्याच्या टीकेचा पुनरुच्चार

Amit Shah In Pune : उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून विश्वासघात केला, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलाय. ते पुण्यातील सभेत बोलत होते. यावेळी अमित शाह यांनी राज्यातील सरकारवर चौफेर टीका केली. शिवसेनेवर निशाणा साधताना 2019 च्या निवडणुकीत भाजपसोबत शिवसेनेनं विश्वासघात केल्याचा आरोपही लगावला. 

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे मातोश्रीवरील बैठकीत ठरलं होतं. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेनं हिंदुत्व बाजूला ठेवलं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून 2019 मध्ये भाजपसोबत विश्वासघात केला. सत्तेतून पायउतार व्हा आणि मग मैदानात उतरुन दोन - दोन हात करु. जनता कुणाला कौल देते हे पाहूयात. तिन्ही पक्षाने एकत्र लढून भाजपला हरवून दाखवावे, असं आव्हान केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिलेय. 

3. सरकारी पाहुण्यांसाठी चहा बिस्किट तयार आहे, सरकारी यंत्रणेच्या संभाव्य धाडीबद्दल नवाब मलिकांचं खोचक ट्वीट

Nawab Malik Tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांनी ट्विट करत काही ऑफिशल पाहुणे आज सकाळी माझ्या घरी अचानक येणार आहे असं म्हणलं आहे. या पाहुण्यांचं मी चहा बिस्कीट देऊन मोठ्या मनाने आदरातिथ्य करेन. त्यांना योग्य पत्ता हवा असेल तर मला फोन करावा असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

4. बीडमध्ये सामाजिक न्याय खात्यावरुन टीका करणाऱ्या पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंचा टोला तर जळगावात गिरीश महाजन आणि खडसेंमध्येही वाग्युद्ध

5. हेमा मालिनी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर गुलाबराव पाटलांचा माफीनामा, राज्य महिला आयोगाकडून गुलाबरांच्या वक्तव्याची दखल

पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 20 डिसेंबर 2021 : सोमवार : ABP Majha

6. हिवाळी अधिवेशनाचे तीन आठवडे वाया गेल्यानंतर 12 खासदारांच्या निलंबनावर आज खलबतं, निलंबित खासदारांच्या पक्षाच्या गटनेत्यांची बैठक, तोडगा निघणार का याकडे लक्ष

7. महाराष्ट्र आणखी गारठणार, मराठवाडा, विदर्भातल्या जिल्ह्यांत पारा 10 अंशाखाली जाण्याचा अंदाज, उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्याचा परिणाम

8. राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक दत्तात्रय वारेंचं निलंबन, पुणे जिल्हा परिषदेकडून कारवाई, स्थानिक राजकारणातून निलंबन झाल्याचा हेरंब कुलकर्णींचा आरोप

9. नवीन वर्षात मुंबई लोकलमध्ये वाय-फाय सुविधा, मध्य रेल्वेच्या १६५ लोकलमधील साडेतीन हजार डब्यात वायफाय इंटरनेटची सेवा 

10. रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नेव्हिगेशन अॅप लाँच, प्रवासाआधीच रस्त्यांवरील खड्डे आणि धोकादायक वळणांची माहिती मिळणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Pune Speech : राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावेAmitabh Bachchan Apology : मराठी शब्दाचा चुकीचा उच्चार, अमिताभ बच्चन यांनी माफी मागितलीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 21 September 2023 : ABP MajhaTop 70 : सातच्या 70 बातम्या! वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत; शिवसेना आमदाराचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'स्वप्नाला...'
Kisan Rail : बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
बंद झालेली किसान रेल पुन्हा सुरु करा, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची रेल्वेमंत्र्यांकडं मागणी 
Amit Shah : अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
अमित शाह 25 सप्टेंबरला नाशिक दौऱ्यावर; नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा निर्णय होणार? नेमकं काय आहे कारण?
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, अमित ठाकरेंची टीका
मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले, विद्यापीठ राजकीय दबावाला बळी, अमित ठाकरेंची टीका
Embed widget