एक्स्प्लोर
Advertisement
ABP Majha Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 2 ऑक्टोबर 2021 : शनिवार
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
- विदर्भातील अनेक जिल्ह्यात रात्रभर वादळी पाऊस, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी तर पुढील दोन तास पावसाचा इशारा
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर आज मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करणार
- महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 3,105 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 50 जणांचा मृत्यू
- मुंबईतल्या क्लिनअप मार्शल्सची एबीपी माझाकडून पोलखोल, मास्क न घातल्यास कारवाई टाळण्यासाठी अवैधरित्या वसुली, कारवाई करण्याचे प्रशासनाचे आदेश
- उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणाचं यवतमाळ कनेक्शन समोर, धीरज जगतापला उत्तर प्रदेश एटीएसकडून अटक, व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे धर्मांतर करत असल्याचा संशय
- परमबीर सिंहांवर कायदेशीर बाबी तपासून निलंबनाच्या कारवाईची प्रक्रिया, सूत्रांची माहिती तर परमबीर यांना परदेशात पळून जाण्यास भाजप नेत्यांची मदत, नाना पटोलेंचा गंभीर आरोप
- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 152 वी जयंती, पंतप्रधान मोदींच्या निर्देशांनुसार सरकारी कार्यालयांमध्ये प्रलंबित फाईल्सचं स्वच्छता अभियान तर लाल बहादूर शास्त्रींनाही देशवासियांकडून अभिवादन
- मुंबईत 7 ऑक्टोबरपासून 50 टक्के क्षमतेने धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी, तर महाराष्ट्रात चित्रपटगृहं सुरु होणार असल्याने बॉलिवूडमध्ये आनंदाचं वातावरण
- मुंबई वगळता महाराष्ट्रात नवरात्रात गरबा खेळण्यासाठी सशर्त परवानगी, कोरोना नियमांचं पालन करुन गरबा खेळण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आवाहन
- पंजाब किंग्सचा कोलकाता नाईट रायडर्सर पाच गडी राखून विजय, केएल राहुल ठरला विजयाचा शिल्पकार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement