Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 जुलै 2021 | गुरुवार | ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. दुकानांच्या वेळेबाबत निर्बंध शिथिल न केल्यानं व्यापारी आक्रमक, तर सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे बंदच ठेवण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय
2. पंतप्रधान पीक विमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद, अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस असूनही शेतकऱ्यांची पाठ
3. सिंधुदुर्गातल्या निर्मला नदीला पूर आल्यानं 27 गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत; आजही रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट
4. अनिल देशमुखांच्या पत्नी आरती देशमुखांना ईडीचं समन्स, चौकशीसाठी सकाळी अकरा वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना
5. साडेपंधरा हजार शासकीय पदांसाठी लवकरच भरती, तर आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय 62 वर्षांपर्यंत वाढवलं
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 15 जुलै 2021 | गुरुवार | ABP Majha
6. सरकारचं रिमोट कंट्रोल शरद पवारांच्या हाती, नाना पटोलेंचं वक्तव्य; 2014 प्रमाणे धोका टाळण्यासाठी काँग्रेसकडून स्वबळाची तयारी, पटोलेंचं स्पष्टीकरण
7. 'बिग बी बिग हार्ट दाखवा', अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याबाहेर मनसेची पोस्टरबाजी; रस्ता रुंदीकरणासाठी बंगल्याची संरक्षक भिंत तोडण्यासाठी सहकार्याचं आवाहन
8. सायबर फ्रॉडमुळं गमावलेले ३२ लाख पुन्हा परत, मुंबई पोलिसांकडून आरोपीला बेड्या, कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून बचावलं
9. 'प्रेग्नंसी बायबल' पुस्तकावरुन अभिनेत्री करीना कपूर वादात; बायबल शब्दाचा वापर केल्यानं गुन्हा दाखल करण्याची मागणी
10. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात बसमध्ये बॉम्बस्फोट, 13 जणांचा मृत्यू, तालिबान्यांनी स्फोट घडवून आणल्याचा संशय