Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 मे 2021 | बुधवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. 2 ते 18 वर्षांच्या वयोगटासाठी कोवॅक्सीनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीची शिफारस, पीटीआयचं वृत्त, लस 81 टक्के प्रभावी असल्याचा तज्ज्ञांचा दावा
2. 15 मे नंतर निर्बंध वाढणार की शिथिल होणार यासंदर्भात आज निर्णयाची शक्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष, सकाळी अकरा वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचीही खलबतं
3. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाचा वेग मंदावण्याची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, 5 लाख नागरिकांना कोवॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची प्रतिक्षा
4. कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट अवघ्या 3 तासांत मिळण्याची शक्यता, निरी संस्थेचं संशोधन, ड्राय स्वॅब टेक्नोलॉजीचा वापर
5. मुंबईत गृहनिर्माण संस्था आणि खासगी कंपन्यामध्ये लसीकरणास परवानगी, महापालिकेच्या नियमावलीवर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 मे 2021 | बुधवार | ABP Majha
6. मुंबईच्या कोरोना पॅटर्नचा देशभरात डंका, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या उपाययोजना देशभरात राबवण्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा सल्ला
7. मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्क्यांवर, तर नवी मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या 1450 वरून थेट 132 वर; कठोर निर्बंध अन् काटेकोर नियोजनामुळे पुण्यातील रुग्णसंख्येचा आलेखही उतरणीला
8. कोरोनाच्या कामात त्रुटी राहिल्यास सरपंचांवर अपात्रतेची कारवाई करणार, अकोला जिल्हा प्रशासनाची नोटीस, तलाठी-ग्रामसेवकांवर बंधन का नाही, सरपंचांचा सवाल
9. उपवासाऐवजी मासांहारामुळं रोगप्रतिकारशक्ती वाढते, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर वारकऱ्यांचा आक्षेप, वादाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल
10. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारचं राज्यपालांच्या माध्यमातून पंतप्रधानांना पत्र, लवकरच पंतप्रधान मोदींची भेट घेणार मुख्यमंत्र्याची माहिती